शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तिच्या वाढदिवसाला जमले तब्बल 12 लाख लोक!

By admin | Updated: December 29, 2016 23:50 IST

ती कुणी सेलेब्रिटी नाही, की कुण्या बड्या धनिकाची किंवा राजकारण्याची मुलगी नाही. पण तरीही तिच्या वाढदिवसाला तब्बल

ऑनलाइन लोकमत
मेक्सिको सिटी, दि. 29 - ती कुणी सेलेब्रिटी नाही, की कुण्या बड्या धनिकाची किंवा राजकारण्याची मुलगी नाही.  पण तरीही तिच्या वाढदिवसाला तब्बल 12 लाख लोकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे सध्या तिचा वाढदिवस सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. 
ही गोष्ट आहे मेक्सिकोतील एका गावात राहणाऱ्या रुबी इबारा गार्सिया या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलीची.  सोमवारी तिने आपला 15 वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी लाखो लोक पाहुणे म्हणून तिच्या गावी पोहोचले होते. त्याचे झाले असे की, रुबीच्या वडलांनी आपल्या मुलीचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून आपले नातेवाईक मित्र आप्तेष्ट यांना वाढदिवसाचे आमंत्रण दिले. बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. 

आपण पाठवलेला व्हिडिओ एवढा प्रसारित होईल, याची कल्पना रुबीच्या आई-वड़लांनीही केली नव्हती.   या निमंत्रणाची चर्चा एवढी की मेक्सिकोतील म्युझिकल स्टार्स पार्टीत येण्याविषयी चर्चा करू  लागले. काही कंपन्यांनी तर जाहीरातीचीहा ऑफर दिली. अगदी मेक्सिकन एअरलाइन्सनेही रुबीच्या वाढदिवसाला जाण्यासाठी 30 टक्के सुट देण्याचीही घोषणा केली. 
त्यामुळे प्रत्यक्ष वाढदिवसादिवशी नातेवाईकांसोबतच लाखो अनोळखी लोकही हजर झाले. बघता बघता गर्दी इतकी वाढली की गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. एवढा गाजावाजा झाल्यावर प्रसारमाध्यमांनीही तेथे धाव घेतली आणि रुबीचा वाढदिवस खऱ्या अर्थाने दणक्यात साजरा झाला.