धक्कादायक! बागेतला आंबा तोडला म्हणून दहा वर्षांच्या मुलाची गोळी घालून हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 11:24 IST2018-06-22T11:24:58+5:302018-06-22T11:24:58+5:30

बागेतील आंबा तोडला म्हणून एका दहा वर्षांच्या मुलाची गोळी घालून हत्या करण्यात आली

10-year-old boy was shot dead | धक्कादायक! बागेतला आंबा तोडला म्हणून दहा वर्षांच्या मुलाची गोळी घालून हत्या 

धक्कादायक! बागेतला आंबा तोडला म्हणून दहा वर्षांच्या मुलाची गोळी घालून हत्या 

पाटणा - बागेतील आंबा तोडला म्हणून एका दहा वर्षांच्या मुलाची गोळी घालून हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी बिहारमधील खगडिया जिल्ह्यात घडली आहे. खगडिया जिल्ह्यातील गोगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संतापजनक प्रकार घडला असून, या मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. 




 बागेतून काही आंबे चोरले एवढाच या मुलाचा अपराध होता. त्यासाठी  त्याची हत्या करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खगडियामधील रुग्णालयात पाठवला आहे. तसेच आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. ही घटना घडल्यानंतर आरोपीचे कुटुंबीय फरार झाले आहेत. याआधी उत्तर प्रदेशमधील फतेहपूर येथे आंबे तोडल्याने झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाला जिवंत जाळल्याचा प्रकार घडला होता.  

Web Title: 10-year-old boy was shot dead