शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

०७... चिमुकली

By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST

(फोटो)

(फोटो)
चिमुकलीचा टाक्यात बुडून अंत
दहेगाव (रंगारी) येथील घटना : होळीच्या उत्सवावर दु:खाचे सावट
खापरखेडा/कोराडी : आई घरात स्वयंपाक करीत असताना तिच्या अवतीभोवती खेळणारी दीड वर्षाची चिमुकली नकळत अंगणात गेली आणि ती अंगणातील तीन फूट खोल टाक्यात कोसळली. त्यातील पाण्यात तिचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सावनेर तालुक्यातील दहेगाव (रंगारी) येथे गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे गावात कुठेही होळी पेटविण्यात आली नाही.
ईश्वरी प्रवीण जाधव (१८ महिने) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. ईश्वरीचे वडील प्रवीण जाधव हे स्टार बसवर चालक म्हणून नोकरी करतात. होळीच्या दिवशी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. त्यामुळे घरी ईश्वरीची आई कीर्ती जाधव आणि प्रवीण जाधव यांची भाची साक्षी या दोघीच होत्या. होळी असल्याने त्या दोघेीी स्वयंपाक करण्यात व्यस्त होत्या. त्याच वेळी ईश्वरी ही त्यांच्या अवतीभोवती खेळत होती.
दरम्यान, काही वेळाने ईश्वरी ही रांगत अंगणात आली. तिच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. त्यांच्या घराच्या अंगणात असलेल्या विहिरीच्या बाजूला तीन फूट खोल टाके आहे. ईश्वरी ही खेळत या टाक्याजवळ आली आणि कुणाचेही लक्ष नसताना त्या टाक्यात कोसळली. त्यानंतर अर्ध्या तासाने तिची आई कीर्ती ही छतावर सुकविण्यासाठी टाकलेले कपडे काढण्यासाठी बाहेर आली. त्याच वेळी तिला ईश्वरी ही टाक्यातील पाण्यात तरंगत असताना आढळून आली.
सदर दृश्य पाहताच तिने हंबरडा फोडला. सदर घटनेमुळे कीर्तीला जबर मानसिक धक्का बसला. त्यामुळे शेजारी गोळा झाले. क्षणार्धात सदर बातमी गावभर पसरली. त्याच वेळी स्थानिक तरुण व ग्रामस्थांनी गावातील हनुमान मंदिराच्या आवारात सार्वजनिक होळी पेटविण्याची तयारी चालविली होती. सदर बातमी कळताच त्यांनीही ईश्वरीच्या घराकडे धाव घेतली. तिच्या पार्थिवावर धूलिवंदनाच्या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे दहेगाव (रंगारी) येथे कुणीही धूलिवंदनाला रंग खेळले नाही. (प्रतिनिधी/वार्ताहर)
***