शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला आले आहात काहीतरी मदत करून जा

By admin | Updated: September 8, 2016 00:53 IST

निफाड : तालुक्यातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती; गुरूवारी नाशिक येथे देणार निवेदन

 निफाड : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत आज गुरुवारी नाशिक दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे शेतकरी नेते राजेंद्र डोखळे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या निवेदनाचा आशय असा, मागील वर्षी आम्ही पिक कर्जाची उचल केलेली होती. दि: ३१ मार्च पूर्वी आम्ही आमच्या कर्जाची व्याजासह परतफेड केलेली आहे. आम्ही नियमितपणे कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहोत. दि. ३१ मार्चला कर्ज परतफेड करून पीक कर्जाची मागणी केली असता , विविध कार्यकारी सेवा संस्थांमार्फत बँकेने , कर्ज मर्यादा कमला पत्रकाद्वारे (क.म.पत्रक) आम्हा शेतकऱ्यांना पीक कर्जाची मंजूरी दिलेली आहे. परंतु प्रत्यक्ष कर्ज उचल देनेस बँकेने नकार दिलेला आहे. कर्जासाठी रकमेची उपलब्धता नसल्याने कर्ज वाटप करू शकत नाही असे कारण बँकेने पुढे केले आहे. बँकेच्या कर्ज वाटपाच्या नियोजनाच्या अभावामुळे व शेतकऱ्यांना शासनाने कर्ज पुरवठा करण्यासाठी केलेल्या दुर्लक्षामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. द्राक्ष पिकासाठी आॅगस्ट, सप्टेम्बर महिना अत्यंत महत्वपूर्ण असून हंगामपूर्व तयारीसाठी कर्ज रकमेची नितांत आवश्यकता आहे. आपणास या निवेदनद्वारे विनंती करण्यात येते की, आम्ही मागणी केल्या प्रमाणे मंजूर क.म. पत्रकाप्रमाणे शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा विनाविलंब करण्यात यावा. आम्ही शेतकऱ्यांनी बँकेची कर्जफेड करण्यासाठी स्वभांडवल वापरलेले आहे. स्वत:जवळील रक्कम संपल्याने पीक उभारणीसाठी कर्ज रकमेची गरज आहे. विनाविलंब पीककर्ज न मिळाल्यास नैराश्यातुन आत्महत्येचा विचार शेतकरी अवलंबण्याची शक्यता आहे. पीक कर्ज न मिळाल्याने अशा काही घटना घडल्यास त्याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन व नाशिक जिल्हा मध्य.सह.बँक, हेच जबाबदार राहतील हे खेदाने सांगावेसे वाटते.गोदवारीला मोठ्या प्रमाणात पुर येऊन गेलेला आहे. अचानक आलेल्या पुरामुळे आमची गुरेढोरे, पीक वाहून उध्वस्त झालेली आहेत. त्याचीही माहिती घ्या व नाशिकला आलेच आहात तर काहीतरी मदत करुन जा. कर्जापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी नासिक जिल्हा मध्य. सह. बँकेच्या प्रधान कार्यालय, द्वारका सर्कल, नासिक शेजारील नासिक जिल्हा औद्योगिक सह. संघ येथे दुपारी २ वा उपस्थित रहावे असे आवाहन राजेंद्र डोखळे यांनी केले आहे. (वार्ताहर)