शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

एकत्रित कुटुंब पध्दत रुजविण्यात महिलांचा मोलाचा वाटा

By admin | Updated: November 24, 2014 23:48 IST

अशोक नायगावकर : सिन्नर वाचनालयात ग्रंथालय सप्ताहास प्रारंभ

सिन्नर : भारताची ताकद कोण्या राजकीय पक्षात नसून ती एकत्रित कुटुंबपध्दतीत आहे. भारतामध्ये एकत्रित कुटूंब पध्दत रुजण्यात महिलांचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ मराठी विनोदी लेखक व विडंबन कवी अशोक नायगावकर यांनी केले.
सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या ४२ व्या ग्रंथालय सप्ताहाचे पहिले पुष्प नायगावकर यांनी गुंफले. यावेळी नायगावकर यांनी ‘हास्य हंगामा - ३’ या विनोदी कार्यक्रमातून सिन्नरकरांना पोट धरुन हसवले. ‘अशीच तिंबत कणीक राहा तू, गरम तव्यावर भाजत भाज्या, सजव आपल्या सिध्द हातांनी अन्नब्रह्म हे उदव पोकळीत’ या कवितेद्वारे नायगावकर यांनी एकत्र कुटूंब पध्दतीतील महिलांच्या योगदानाचा गौरव केला. पुराणकाळापासून आजतागायत पुरुषांच्या सरंजामशाही मानसिकतेमुळे महिलांवर होत असलेल्या अन्याय त्यांनी आपल्या विनोदी शैलीत मांडतांना सिन्नरकरांना मनमुराद हसविले. स्त्री शिक्षणानंतरच्या काळात महिलांची कार्यक्षमता दुपटीने वाढल्याचेही त्यांनी सांगितले.
पूर्वी सर्व कवी आपल्या कवितांमध्ये वेगवेगळ्या प्रतिमा वापरत. यामुळे कवितेची उंचीही वाढली जायची. मात्र आजच्या पिढीला या प्रतिमांचा अर्थ समजत नसल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या विनोदाचे प्रसंग यावेळी नायगावकर यांनी उपस्थितांना सांगितले. पूर्वी प्रेम समुद्र किनाऱ्यावर, निसर्गाच्या सान्निध्यात फुलायचे. आता तरुणांना मोकळी हवा बाधते, हिरवळीची अ‍ॅलर्जी होते असे सांगताना प्रदुषणाची आपल्या कशी सवय जडल्याचे विदारक सत्यही त्यांनी सिन्नरकरांसमोर मांडले. सव्वाशे कोटी लोक अन् अडीचशे कोटी हातांच्या देशात शेतीत काम करण्यासाठी कोणी तयार नसल्याचे भीषण वास्तवही त्यांनी विनोदाद्वारे उपस्थितांच्या लक्षात आणून दिले. पूर्वी पाण्यासाठी आंदोलने झाली. शंभर वर्षापूर्वी ज्योतिबा फुलेंनी पाण्याचे हौद माणसांसाठी खुले केले. मात्र, माणसाने अविश्वासापोटी पाण्यालाही बाटलीबंद केल्याची कोपरखळीही नायगावकर यांनी मारली.
यानंतर महेश भानूशाली यांनी पशू, पक्षी, रेल्वे इंजिनचे तीन आवाज एकाच वेळी काढण्यासह नामवंत सिने-कलाकरांच्या नकला करत सिन्नरकरांची मने जिंकली. वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे प्रायोजक मिलींद गुजराथी यांनी परिचय करुन दिला. याप्रसंगी सिन्नरकर उपस्थित होते. (वार्ताहर)