शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची छेड काढल्याच्या कारणावरून इसमाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 19:32 IST

संशयित आरोपी गोपाळ शेखर कुमावत, लखन शेखर कुमावत, शेखर बंडू कुमावत व शुभम शेखर कुमावत यांचेसह काही साथीदारांनी रमेश यास बेदम मारहाण केली.

ठळक मुद्देसंशयितांकडून पंख्याला गळफास घेतल्याचा बनाव

सिडको : अंबड येथील आशिर्वादनगर परिसरात चार ते पाच जणांनी एका इसमाचा मारहाण करून खून केल्याचा प्रकार घडला. दरम्यान महिलेची छेड काढल्याच्या कारणावरून मारहाण करीत हा खून केल्याचे पोलीसांनी सांगितले. या प्रकरणी अंबड पोलीसांनी संशयित गोपाळ कुमावत यास ताब्यात घेतले असून त्याच्यासह त्यांच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल आहे.याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, रमेश दगा वानखेडे (41, रा. पांडुरंग कृष्णा रोहाऊस, आशिर्वादनगर, अंबड) येथे राहतात. सोमवारी (दि. 28) रोजी रात्री रमेश याने एका महिलेची छेड काढल्याच्या संशयावरून त्याचा काहीजणांशी वाद झाला होता. हाच राग धरून दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. 29) रोजी सकाळी यातील संशयित आरोपी गोपाळ शेखर कुमावत, लखन शेखर कुमावत, शेखर बंडू कुमावत व शुभम शेखर कुमावत यांचेसह काही साथीदारांनी रमेश यास बेदम मारहाण केली. या मारहाणीत रमेश यास गंभीर दुखापत होवून तो जखमी झाला होता. यावेळी परिसरातील नागरिकांनी रमेश याची मारहाण करणाऱ्यांकडून सुटका केली व त्याला घरात ठेवले. यावेळी रमेश याने घरात गळफास घेतला असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर नागरिकांनीच त्याला एमएच-15- डीएस-5302 या चारचाकी गाडीतून जिल्हा रूग्णालयात दाखल केले. यावेळी रुग्णालयात शवविच्छेदन केले असता रमेश याचा मृत्यू गळा आवळून नाही तर गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान मंगळवारी दरवर्षीप्रमाणे रमेश आणि त्याचा भाऊ अमृत हे दोघेजण संगमेश्वर येथे बहिणीकडे भाऊबीजेसाठी जाणार होते. भावाने रमेश यास फोन केला असता त्याने फोन न उचलल्याने अमृत हा थेट बहिणीकडे जाण्या निघाला मात्र रस्त्यात भाऊ सिरीअस असल्याचा फोन आल्याने तो पुन्हा जिल्हा रुग्णालयात गेला. त्यावेळी त्याला समजले की, सोमवारी (दि. 28) रोजी रात्री काही जणांनी रमेश यास मारहाण करून जखमी केल्याचे समजले. त्यानंतर अमृत याने याबाबतची माहिती अंबड पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. यानंतर अमृत यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे करीत आहेत.संशयितांकडून बनावदरम्यान रमेश वानखेडे यास संशयित गोपाळ कुमावत व त्याच्यासह चार ते पाच जणांना बेदम मारहाण करून त्यास त्याचा घरात नेऊन घरातील पंख्याला गळफास घेतल्याचे पोलिसांना सांगितले असले तरी शव उच्छेदनात रमेश याचा मारहाणीत गाला आवळून खून झाल्याचे  सांगितले.

 

टॅग्स :Murderखूनnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी