शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

होईल चारपट गर्दी; मग कशी देतील मोकळीक?

By admin | Updated: September 4, 2015 23:35 IST

होईल चारपट गर्दी; मग कशी देतील मोकळीक?

नाशिक : रक्षाबंधनामुळे पहिल्या पर्वणीला पाठ फिरविणारे देशभरातील भाविक दुसऱ्या पर्वणीच्या अमावास्येच्या शुभ मुहूर्तावर चारपट गर्दी करतील, मग पहिल्या पर्वणीला आलेले भाविक किती असा साहजिक उपस्थित होणारा प्रश्न कायम असेल तर मग एकपट भाविकांसाठी संपूर्ण शहराची गळचेपी करणारी यंत्रणा चारपट गर्दीच्या वेळी मोकळीक कशी देतील?दुसऱ्या पर्वणीच्या फेरनियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बोलविण्यात आलेल्या गुरुवारच्या बैठकीत शहरवासीय तसेच बाहेरून येणाऱ्या भाविकांची पर्वणी सुसह्य होण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे पोलीस-प्रशासनाने जाहीर केले असले तरी, त्यातून अनेक प्रश्न अनुत्तरितच राहत असून, त्यातील काही निवडक प्रश्न पुढीलप्रमाणे -चारपट भाविक दुसऱ्या पर्वणीला येणार असतील व पहिल्या पर्वणीला जर एकच पट भाविक येणार असल्याचे माहीत असून, पोलिसांनी चोख (?) नियोजन केल्याचे मानले जात असेल तर चारपट भाविकांच्या सुरक्षिततेसाठी साहजिकच नियोजनात आणखी बदल करावा लागेल. असा बदल करताना भाविकांना अधिकाधिक मोकळी दिली जाईल की, आहे तोच बंदोबस्त व बॅरिकेडिंग आणखी आवळली जाईल? समजा बॅरिकेडिंग कमी केली तरी पहिल्या पर्वणीला (नाशिकरोड वगळता) भाविकांसाठी जे मार्ग ठेवण्यात आले, त्यात कोणताही बदल जर केलेला नाही तर भाविकांची पायपीट कशी कमी होईल? ज्या मार्गावरून भाविक जातील त्यांच्या सुरक्षिततेसाठी मार्ग निर्विघ्न ठेवण्यासाठी वाहनांना बंदी घालणार की नाही? भाविक मार्गाला जोडणारे उपरस्ते बंद राहणार की खुले? भाविक मार्गावर नाशिककरांना प्रवेश करता येईल की नाही? जर नाशिककर भाविक मार्गावर प्रवेश करू शकतील तर या मार्गाला जोडणारे रस्ते बॅरिकेडिंग मुक्त असतील की नाही? प्रशासकीय मार्गात फेरबदल केले जातील की आहे तोच मार्ग वापरला जाईल? जर प्रशासकीय मार्ग भाविक व नाशिककरांसाठी खुला केला जाईल तर मग आपत्कालीन परिस्थितीत कोणता मार्ग अवलंबला जाईल? पुणे म्हणजेच चिंचोली / मोहगाव बाह्य वाहनतळावरून थेट महामार्ग बसस्थानकावर येणारे भाविक व रेल्वेने येणारे भाविक जर लक्ष्मणघाटावर स्नानासाठी जातील तर दसक घाटाचा घाट कशासाठी? नाशिकरोडचे भाविक, धुळे, दिंडोरी, त्र्यंबक व मुंबईकडून येणारे भाविक जर द्वारकामार्गे लक्ष्मीनारायण घाटावर स्नानासाठी जातील तर या घाटावर गर्दी होणार नाही का? या घाटावर गर्दी वाढली तर पुन्हा भाविकांना आल्या पावली पिटाळणार का? चिंचोली - मोहशिवारातील भाविकांना मुंबईनाक्यापासून पायपीट, तर रेल्वेने आलेल्यांना थेट द्वारकापर्यंत वाहन सौख्य मिळणार असेल तर अन्य मार्गाने येणाऱ्या भाविकांवर पायपिटीचा अन्याय कशाला? त्र्यंबकेश्वरकडून येणाऱ्या भाविकांसाठी सातपूर हा एकमेव मार्गच असेल, तर मग या मार्गावरून नाशिककर सुखनैव विहार करू शकतील काय?