वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी वन्यजीवप्रेमींचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 17:43 IST2019-05-12T17:40:58+5:302019-05-12T17:43:59+5:30
मुक्या जिवांची तृष्णा भागावी जेणेकरून दुष्काळाचे ते बळी ठरू नयेत आणि वन्यजीवप्रेमी म्हणून आपले कर्तव्याची जाणीव ठेवून इको-एको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी आपपसांत वर्गणी गोळा करून ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक झालेले पाणवटे पाण्याने भरण्याचा उपक्रम हाती घेतला.

वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी वन्यजीवप्रेमींचा पुढाकार
नाशिक : जिल्ह्यातील येवला तालुक्यात माणसांना पिण्याच्या पाण्याची भ्रांत पडली असून, उन्हाची तीव्रता अन् पाण्याचे दुर्भिक्ष्यामुळे येथील मुक्या प्राण्यांच्या जीवाची काहिली होत आहे. वन्यजिवांच्या तृष्णेची जाणीव शहरातील ‘इको-एको फाउंडेशन’च्या स्वयंसेवकांना झाली आणि त्यांनी भूतदयेतून का होईना, या स्वयंसेवकांनी ममदापूर राखीव वनसंवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक पाणवठे भरण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे.
मुक्या जिवांची तृष्णा भागावी जेणेकरून दुष्काळाचे ते बळी ठरू नयेत आणि वन्यजीवप्रेमी म्हणून आपले कर्तव्याची जाणीव ठेवून इको-एको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी आपपसांत वर्गणी गोळा करून ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक झालेले पाणवटे पाण्याने भरण्याचा उपक्रम हाती घेतला. गुढीपाडव्याच्या दिवशी या स्वयंसेवकांनी ही आगळीवेगळी गुढी उभारून या उपक्रमाचा शुभारंभ केला. आतापर्यंत आठ टॅँकर पाणी येथील पाणवठ्यांसाठी देण्यात आले आहे. तसेच पाणवठ्यांसाठी २५० चौरस मीटर इतके पाणकापडदेखील पुरविले आहे. मेअखेरपर्यंत या भागातील पाणवटे संस्थेने दत्तक घेतले असून, हा उपक्रम पहिल्या पावसापर्यंत सातत्याने राबविण्याचा मानस महाले यांनी व्यक्त केला.