शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

पोहीत जंगली श्वापदाचा हल्ला

By admin | Updated: October 23, 2016 22:41 IST

नांदगाव : चौघे जखमी, परिसरात घबराट

नांदगाव : नांदगाव तालुक्यातील पोही येथे रात्री अज्ञात जंगली श्वापदाने केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल असून, पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. हल्ल्यात एके ठिकाणी काका-पुतण्या व दुसरीकडे सासरा-सून जखमी झाले आहेत. पोही येथील रघुनाथ कोते (७०), श्रावण मोरे (६०), संजय मोरे (२७), ललिता कोते (२३) जखमी झाले असून, त्यांच्यावर डॉ. रोहन बोरसे व डॉ. प्रशांत जुन्नरे उपचार करीत आहेत. हल्ला झालेल्या मोरे व कोते यांच्या घरांमध्ये सुमारे ४०० मीटर्स अंतर असून, या दोन ठिकाणी हल्ला झाला. रात्री कोपीच्या बाहेर बाजरीशेजारी वरील मंडळी झोपली असताना हा प्रकार घडला. मोरे कुटुंबीयातले काका व पुतण्या यांनी काठ्यांनी जोरदार प्रतिकार केला. पण तो कुत्रासदृश प्राणी पुन्हा पुन्हा अंगावर धावून येत होता, अशी माहिती संजय मोरे यांनी दिली. मोरे यांच्या जबरदस्त प्रतिकारापुढे थोड्या वेळाने माघार घेत त्याने काही अंतरावर झोपलेल्या कोते यांच्यावर हल्ला चढविला. रघुनाथ कोते यांनी हिंमत करून सून ललिता हिला कोपऱ्यातले दांडके आणायला सांगितले. त्यांनी दोन चार दांडके त्या प्राण्याच्या पाठीत घातले. मग मात्र तो प्राणी पळून गेला. पण तोपर्यंत रघुनाथ चांगलेच जखमी झाले होते. ते ७० वर्षांचे आहेत. वयाच्या मानाने त्यांनी जबरदस्त झुंज दिली. त्यांना पस्तीस टाके घालण्यात आले आहेत. इतरांना देखील कमी अधिक प्रमाणात टाके घालण्यात आले आहेत, तर ललिता हिने कोंबड्यांच्या खुराड्यास त्या प्राण्याने बाजूला ढकलून दिल्याची माहिती दिली. वनविभागाचे वनक्षेत्रपाल विक्रम आहिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण नाशिक येथे असून, वनपाल भालेराव व वनरक्षक सुरेखा खाजे यांना जागेवर पंचनामा करण्यासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती दिली. जिल्हा रुग्णालयात रेबीपोरआयजीएम हे औषध असते. म्हणून जखमींना नाशिक येथे हलविण्यात येनार असल्याची माहिती डॉ. बोरसे व डॉ. जुन्नरे यांनी दिली. (वार्ताहर) काही वर्षांपूवी तालुक्यातील जळगाव बु. येथे बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यात प्रशासकीय दिरंगाईने ग्रामस्थ चिडल्याने दंगलसदृश परिस्थिती निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पोही ग्रामस्थांमध्ये या घटनेमुळे दहशत निर्माण झाली आहे.जंगली श्वापद बिबट्या की लांडगा की तरस याबाबतीत वेगवेगळी माहिती मिळाली. हल्ल्यात जखमी झालेल्यांना तो प्राणी बिबट्या असल्याचा संशय आहे, तर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सच्या मते तो लांडगा किंवा तत्सम प्राणी असण्याची शक्यता आहे. वनपाल वाल्मीक भालेराव यांनी तो जंगली कुत्रा असण्याची शक्यता वर्तवली आहे.