शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

भींतीच्या भगदाडमध्ये अडकलेला बिबट्या डरकाळ्या फोडतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 17:41 IST

रविवारी मध्यरात्री बिबट्या अचानकपणे एचएएलच्या दगडी संरक्षण भिंतीला असलेल्या भगदाडातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात अडकून पडला.

ठळक मुद्देअवघ्या तासाभरात रेस्क्यू पथके घटनास्थळी दाखलतार आणि वायरींच्या जाळ्यात बिबट्या पूर्णपणे अडकला बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देण्यात आले

नाशिक : मौजे साकोरे मिग येथील एचएएल मीगच्या परिसरात असलेल्या संरक्षण भिंतीच्या भगदाडमधून जाण्याच्या प्रयत्नात रविवारी (दि.२०) मध्यरात्रीच्या सुमारास एक प्रौढ बिबट्या अडकला. भगदाडच्या समोरील बाजूने संरक्षक तारेचे कुंपण असल्यामुळे बिबट्याला बाहेर पडता येत नसल्याने तो सुटकेसाठी झटापट करत होता. घटनेची माहिती मिळताच वनविभाग पूर्वच्या चांदवड, नाशिक पश्चिमच्या रेस्क्यू पथकाने धाव घेत बिबट्याला भुल देत सुटका केली.रविवारी मध्यरात्री बिबट्या अचानकपणे एचएएलच्या दगडी संरक्षण भिंतीला असलेल्या भगदाडातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात अडकून पडला. कारण भिंतीच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक लोखंडी तारेचे कुंपण होते. त्यामुळे बिबट्याला भगदाडमधून बाहेर पडणे शक्य होत नव्हते. त्यामुळे बिबट्या गुरगुरत डरकाळ्या फोडू लागला. तारेमुळे बिबट्याच्या शरीरावर काही प्रमाणात जखमा झाल्या. दिवस उगविल्यानंतर बिबट्या काही स्थानिकांच्या नजरेस पडला. त्यानंतर तेथील नागरिकांनी तत्काळ ओझर पोलीस ठाण्यासह वनविभागाला माहिती कळविली. तत्काळ उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी चांदवड, नाशिक पश्चिम कार्यालयांमधील रेस्क्यू पथकांना सर्व अत्यावश्यक साधनांसह घटनास्थळी पोहचण्याचे आदेश दिले. अवघ्या तासाभरात पथके घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही पथकांचे प्रमुख वनक्षेत्रपाल संजय पवार आणि विवेक भदाणे यांनी परिस्थितीचा अंदाज घेत त्वरित वनपाल मधुकर गोसावी, नाना चौधरी, दीपक जगताप, सुनील महाले इको-एको फाउण्डेशनचे अभिजीत महाले यांच्यासह अन्य वन्यजीवप्रेमींना सुचना देत ‘रेस्क्यू आॅपरेशन’ सुरू केले. बिबट्या तार आणि वायरींच्या जाळ्यात पाठीमागून पूर्णपणे अडकलेला असल्याचे लक्षात आल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेत बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. त्यांनतर वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याला पिंजºयात घेऊन एचएएलच्या हद्दीतच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तोरण पवार, डॉ. अल्केश चौधरी यांच्यामार्फत जखमांवर उपचार सुरू केले. सायंकाळी बिबट्या शुध्दीवर आला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयwildlifeवन्यजीवleopardबिबट्याforest departmentवनविभाग