इस दिल में धडकता क्या हैं!

By Admin | Updated: September 16, 2014 00:06 IST2014-09-15T22:38:13+5:302014-09-16T00:06:13+5:30

इस दिल में धडकता क्या हैं!

What is shocked in this heart! | इस दिल में धडकता क्या हैं!

इस दिल में धडकता क्या हैं!



नाशिक :
आज अगर रास भी
आ जाए तो क्या होता है,
कल बदल जाएगी
दुनिया का भरोसा क्या है,
दिल तो उस शोक सीतमगर ने
कभीका छिना,
तो इस दिल में धडकता क्या है...
यासारखी गजल आणि जीवनातील विविध प्रसंग उलगडीत शायर शफक ऊर्फ सचिन पिळगावकर यांनी रसिकांना त्यांच्या जीवनातील विविध पैलू उलगडून दाखविले.
निमित्त होते ‘लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रमांतर्गत सचिन पिळगावकर यांच्या मुलाखतीचे. लहान असताना चित्रपटासाठी दिलेल्या पहिल्या टेस्टमध्ये नकार मिळाल्याची आठवण सांगताच सचिन यांनी त्यांच्या येणाऱ्या काळातील ‘सांगतो एका’ या चित्रपटाबद्दल भरभरून सांगितले. आपल्या आयुष्यातील सर्व प्रसंग आपल्या चाहत्यांना माहिती व्हावे यासाठी मी चरित्र लिहिल्याचे सांगत ते चरित्र पहिल्या ५० वर्षांचे होते; पुढचा भाग नंतरच्या ५० वर्षांचा असेल, असेही त्यांनी सांगितले.
जसे आठवत गेले तसे लिहित गेलो. त्यात अमुक एका पद्धतीने लिहिण्याचे कधीच ठरविले नव्हते. फक्त माझ्या शैलीत ती प्रसिद्ध व्हावी ही माझी इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. कुटुंबातील काही सदस्यांना नको असताना माझा जन्म झाल्याचे त्यांनी सांगितले.
सुधीर फडके यांनी माझ्यातला कलावंत ओळखला आणि त्यांच्यामुळेच मला चित्रपटात काम करण्याची संधी वयाच्या पाचव्या वर्षी मिळाल्याचे सचिन यांनी सांगितले. माझा उर्दूचा अभ्यास मीनाकुमारी यांच्यामुळेच झाला हे सांगताना सचिन यांनी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, मजरुह सुल्तानपुरी यांच्यासह विविध कलावंतांच्या आठवणी सांगितल्या. त्यात त्यांनी अशोक सराफ मोठ्या भावासारखा असल्याचे सांगितले. कौटुंबिक बाबींवरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. सदानंद जोशी यांनी त्यांना यावेळी बोलते केले. याप्रसंगी व्यासपीठावर मेहता पब्लिशिंगचे सुनील मेहता, नेमीचंद पोद्दार, दामोदर मानकर उपस्थित होते. वसंत खैरनार यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)

Web Title: What is shocked in this heart!