शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

स्वागताला बुके, पिण्यासाठी बिसलरी !

By admin | Updated: November 18, 2016 00:52 IST

पथक आश्चर्यचकित : आश्रमशाळांच्या तपासणीतील तथ्य

नाशिक : स्वागताला फुलांचा पुष्पगुच्छ, पिण्यासाठी बिसलरीचे पाणी, नाश्त्याला काजू, बदाम पाहून आश्चर्यचकित झालेल्या महिलांच्या पथकाला आश्रमशाळांच्या संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी आणखी एक धक्का दिला तो म्हणजे पथकाकडे असलेल्या प्रश्नावलीची नक्कल प्रत दाखवून! कळवण तालुक्यातील आश्रमशाळेत तपासणीसाठी गेलेल्या पथकाला बुधवारी आलेला हा अनुभव पाहता, संस्थाचालकांकडून आश्रमशाळा कशा चालविल्या जातात व त्यांचे आदिवासी विकास विभागाशी कसे साटेलोटे आहे, हेच यातून स्पष्ट झाले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या आश्रमशाळा तपासणी पथकाचे शाळांच्या संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी केलेल्या आदरातिथ्याने महिलांचे पथक हुरळून गेले आहे. नाशिक जिल्ह्यातील शासकीय व खासगी अनुदानित अशा सुमारे १८० आश्रमशाळांच्या तपासणीसाठी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले ३० पथकांनी बुधवारपासून मोहीम सुरू केली. अचानक या तपासणी पथकाने आश्रमशाळांना भेटी देऊन तेथील वास्तव जाणून घेत, मुलींशी संवाद साधावा व वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणे शासनाने अपेक्षित ठेवले आहे. प्रत्यक्षात मात्र आश्रमशाळा संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी या तपासणीपूर्वीच तयारी करून ठेवल्याचे अनुभव आता पथकांना येत आहेत. कळवण तालुक्यातील एका आश्रमशाळेवर पथक धडकताच, तेथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन पथक प्रमुख व सदस्यांचे स्वागत केले. त्यानंतर पिण्यासाठी बिसलरीच्या बाटल्याही आणून ठेवल्या होत्या. आश्रमशाळेतील जेवणाचा दर्जा पथकाने तपासू नये म्हणून पाच वाजता म्हणजे शाळेच्या वेळेतच विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले होते, त्यामुळे पथकाला त्याच्या दर्जाची तपासणी करता आली नाही. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसऱ्या एका तालुक्यात मात्र पथकाला आश्रमशाळेचा शोध घेण्यासाठी धावाधाव करावी लागली. दुर्गम भागातही आश्रमशाळा असल्याने तेथे सुविधांची वानवाच आढळून आली.