शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडकरांना घरपोच पाणीपुरवठा

By admin | Updated: April 6, 2017 00:43 IST

चांदवड : येथे घरपोच शुद्ध पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला.

 चांदवड : येथे घरपोच शुद्ध पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. शहरासाठी राज्य शासनाने ६४ कोटींची महत्त्वाकांक्षी पाणीयोजना दिली. ही योजना येत्या १५ महिन्यांत पूर्ण होईल. तोपर्यंत स्वच्छ पाणी मिळावे या भावनेतून आज चांदवड नगरपरिषद व प्रथमेश एंटरप्राईजेस यांच्या संयुक्त विद्यमाने जलतृप्ती योजनेचा शुभारंभ करीत असल्याचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी चांदवड नगरपरिषदेने आयोजित केलेल्या जलतृप्ती योजनेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना केले.नागरिकांनी योजनांसाठी तसेच थकबाकी भरून सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हरीश जैन, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील शेलार, उपनगराध्यक्ष कविता उगले, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, शिवसेना गटनेते व नगरसेवक जगन्नाथ राऊत, कॉँग्रेस गटनेते व नगरसेवक रवींद्र अहिरे, अ‍ॅड. नवनाथ अहेर, अशपाक खान, अल्ताफ शेख, बाळू वाघ, राजकुमार संकलेचा, रेखा गवळी, इंदूबाई वाघ, जयश्री हांडगे, पार्वताबाई पारवे, अर्चना पूरकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय शेळके, सोनुपंत ठाकरे, कांतीलाल बाफना, संदीप उगले, सोनुपंत ठाकरे, कांतीलाल बाफना, बाळासाहेब वाघ, ज्ञानेश्वर भालेराव आदि उपस्थित होते. यावेळी प्रथमेशचे संचालक हरीश जैन, अन्वर शहा, सुनील शेलार यांची भाषणे झाली. प्रास्ताविक जगन्नाथ राऊत यांनी केले. (वार्ताहर) कार्यक्रमास गोविंद कर्डिले, वर्धमान पांडे, अन्वर शहा, शरद बोऱ्हाडे, प्रीतम कटारिया, सुरेश जाधव, सुरेखा बिल्लाडे, परवेज पठाण, संग्राम बच्छाव, वर्धमान आबड, अनिल कोतवाल, रवींद्र गवळी, गणेश पारवे, रवि बडोदे, बाळा पाडवी, अरुण बिरारी आदिंसह नगरपरिषदेचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)