शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात दुधापेक्षा पाणी महाग!

By admin | Updated: May 15, 2016 00:30 IST

दुष्काळात तेरावा : चारा-पाणी विकत घेऊनही दुधाला भाव नसल्याने नाराजी

 सिन्नर : गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत दररोजच्या जीवनात दूध व पाणी आवश्यक असते. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्याच आरोग्यासाठी दूध उपयुक्त आहे. मात्र, दुधाचे जेवढे महत्त्व आहे तेवढीच ‘किंमत’ अजूनही मिळालेली नाही. लिटरभर बाटलीबंद पाण्यासाठी २० रुपये मोजावे लागतात तर तेवढेच दूध केंद्रावर विकल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती केवळ १७ ते १९ रुपये पडतात. त्यामुळे दुधापेक्षा पाणी महाग म्हणण्याची वेळ दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.सिन्नर तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. पूर्व भागात दूध उत्पादक शेतकऱ्यांना चारा व पाणी विकत घेऊन गोधन सांभाळावे लागत आहे. दुष्काळी परिस्थिती, चारा व पाणीटंचाई, वाढलेले तपमान, पशुखाद्यांच्या वाढलेल्या किमती यामुळे दूध उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. दुधाच्या उत्पादनाचा खर्च वाढल्याने खरे तर दुधाचे दर वाढणे अपेक्षित होते. मात्र अशा परिस्थितीत दुधाच्या भावात मोठी घसरण झााली आहे. गेल्यावर्षी खासगी दूध संकलन केंद्रावर केंद्रात दुधाला २४ ते २६ रुपये लिटर भाव मिळत होता. आता सदर भाव १८ ते २० रुपयांपर्यंत खाली आला आहे. एकीकडे टंचाई स्थितीने उत्पादन खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. त्यात दुधाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने दूध उत्पादक मेटाकुटीला आला आहे. दुधाला फॅटवरून (गुणप्रत) भाव मिळतो. उत्तम गुणप्रत असलेल्या दुधाला एखाद रुपयाला जास्त भाव मिळत असला तरी, गायींना नियमित पशुखाद्य खायला देणे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न परवडण्याजोगे आहे. दूध संकलन केंद्रावर दूध जमा करण्याची स्पर्धा असली तरी शेतकऱ्यांच्या दुधाला भाव देण्यात सदर संस्था आखडता हात घेत असल्याचे दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. दूध दरात होत असलेल्या सातत्याच्या घसरणीमुळे सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सिन्नर-शिर्डी रस्त्यावर तासभर रास्ता रोको आंदोलन करून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दूध दरात कोणताही बदल झाला नसल्याचे चित्र आहे. खासगी दूध संकलन केंद्रावर शासनाचा अंकुश नसल्याने दूध दरात नेहमीच चढउतार होताना दिसतात. वाढत्या चारा व पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना महागड्या व दुभत्या गायी सांभाळने अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अशा गायींना बाजाराची वाट दाखविल्याचे चित्र आहे. सततच्या दूध दरकपातीमुळे शेतकरी अक्षरश: नागवला जात आहे. (वार्ताहर)