शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

हजारो लिटर पाणी वाया

By admin | Updated: September 30, 2016 02:33 IST

वडाळा-पाथर्डीरोड : महिनाभरापासून पाणीगळती

सिडको : वडाळा-पाथर्डीरोड येथील पार्कसाईड रेसिडेन्सीच्या प्रवेशद्वारासमोरील मुख्य रस्त्यात असलेल्या व्हॉल्व्हमधून गेल्या महिनाभरापासून पाणीगळती होत असून, दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असतानाही महापालिकेकडून याकडे दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील वर्षी जेमतेम पाऊस झाल्याने मनपाच्या वतीने संपूर्ण शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्यात आली होती. याउलट यंदा मात्र धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने मनपाच्या वतीने पाण्याची उधळपट्टी केली जात असल्याचे दिसून येत आहे. वडाळा-पाथर्डीरोडच्या बाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभ्या केल्या गेल्या आहेत. याच भागातील पार्कसाईड रेसिडेन्सीच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरील मुख्य रस्त्यात असलेल्या व्हॉल्व्हमधून गेल्या काही दिवसांपासून पाणीगळती होत असून यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असतानाही याकडे महापलिकेकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्हॉल्व्हमधून पाणीगळती होणे व मुख्य जलवाहिनी फुटणे या व अशा अनेक प्रकारांमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असतानाही मनपा अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही. सामाजिक कार्यकर्ते किशोर गरड व परिसरातील नागरिकांनी याबाबत मनपास कळवूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कामकाज न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकारच नसल्याचेही नागरिकांकडून बोलले जात आहे. (वार्ताहर)