शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

वीज मंडळाचे कर्मचारी निवृत्ती वेतनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: November 14, 2016 01:22 IST

वीस वर्षे : अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ

 नाशिक : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अस्तित्वात असताना वीस वर्षांपूर्वी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्याचा ठराव करण्यात आला. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आली नसून त्यानंतर निवृत्त झालेले शेकडो कर्मचारी आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे यासंदर्भात गेल्या पंधरा वर्षांपासून उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट प्रकरण असून, अशा स्थितीत आता निवृत्त होऊन अनेक वर्ष झालेल्यांना न्याय मिळणार किंवा नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.महावितरणच्या सध्या तीन कंपन्या असल्या तरी त्या आधी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अस्तित्वात होते. राज्य सरकारचे हे महामंडळ असूनही त्याला गैर सरकारी मंडळ मानले जाते. त्यामुळे महामंडळात तेव्हापासून असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना तेव्हा करावा लागला आणि आताही करावा लागत आहे. राज्य शासन आणि महामंडळाने ३१ डिसेंबर १९९६ रोजी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वीस वर्षे झाली तरी त्या ठरावाची अंमलबजावणी झालेली नाही. निर्णय घेणारेच निर्णय बाजूला ठेवतात असा अनुभव यानिमित्ताने आला आहे. कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळावे यासाठी कर्मचारी संघटना आणि सेवानिवृत्तांनी पाठपुरावा करून निवृत्ती वेतन देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे २००१ मध्ये कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यानंतर गेले पंधरा वर्षे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, त्यावर कोणताही निर्णय झाला नसल्याचे सेवानिवृत्त कर्मचारी डी. आर. कुलकर्णी व गो. भ. जामखेडकर यांनी सांगितले. त्यावेळी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन न देता पीपीएफचे पैसे देण्यात आले. परंतु त्यावेळी दहा ते बारा टक्के असलेला व्याजदर आता खूपच घरसला असून, सत्तर - पंच्याहत्तरीतील कर्मचाऱ्यांना आजारपण, घरखर्च भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी सेवानिवृत्तांकडून होत आहे. (प्रतिनिधी)