शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान

By admin | Updated: January 31, 2016 22:11 IST

मनमाड : शिवनेरी विरुद्ध नम्रता पॅनलमध्ये तीव्र चुरस

मनमाड : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. किरकोळ शाब्दिक चकमकी वगळता मतदान शांततेत झाले. शिवनेरी विरुद्ध नम्रता पॅनलमध्ये झालेल्या या तुल्यबळ लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. या निवडणूकीत ९८.२४ टक्के मतदान झाले आहे.बाजार समितीच्या सोसायटी गटातून ११, ग्रामपंचायत गटातून चार, व्यापारी गटातून दोन, हमाल मापारी गटातून एक अशा एकूण अठरा जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात असून यात शिवसेना पुरस्कृत सुहास कांदे, माजी आमदार संजय पवार, गंगाधर बिडगर यांच्या शिवनेरी शेतकरी विकास पॅनलची सरळ लढत जिल्हा बॅँकेचे माजी संचालक चंद्रकांत गोगड यांच्या नम्रता पॅनलशी होत आहे.दोन्ही गटांकडून प्रचारात आघाडी घेतली असून विजयाचा दावा करण्यात येत असला तरी शेतकरी राजा कोणत्या गटाकडे सत्ता सोपवेल, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.या निवडणुकीसाठी मनमाड, कोंढार, हिसवळ या तीन मतदान केंद्रावर रविवारी मतदान घेण्यात आले. कोंढार येथील जि.प. शाळेत कोंढार, नवसारी, भार्डी, दऱ्हेल, बोयेगाव, नांदूर, धनेर, हिसवळ प्राथमिक शाळेत हिसवळ, मांडवड, मोहेगाव, लक्ष्मीनगर, बेजगाव धोटाणे खुर्द तर मनमाड येथील छत्रे विद्यालयाच्या मतदान केंंद्रावर मनमाड, पानेवाडी, नागापुर, अनकवाडे, वंजारवाडी, सटाणे, कऱ्ही, एकवई, पांझणदेव, धोटाणे, अस्तगाव, खादगाव, माळेगाव येथील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. (वार्ताहर)मनमाड कृउबा निवडणुकीसाठी येथील छत्रे विद्यालयाच्या मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची जमा झालेली गर्दी.