मतदारांनी डोळसपणे मतदान करावे,

By Admin | Updated: October 15, 2014 01:01 IST2014-10-15T01:01:17+5:302014-10-15T01:01:52+5:30

मतदारांनी डोळसपणे मतदान करावे,

Voters should vote naturally, | मतदारांनी डोळसपणे मतदान करावे,

मतदारांनी डोळसपणे मतदान करावे,

नाशिक : जागतिक अंध दिनाच्या दिवशी मतदान येत असल्याने या दिवशी मतदारांनी डोळसपणे मतदान करावे, असे आवाहन ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइण्डच्या वतीने करण्यात आले आहे.संस्थेच्या मुलींना दिवाळी सुटी निमित्ताने फराळ आणि आणि पांढरी काठी देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विकास शेजवळ आणि सरचिटणीस रामभाऊ जगताप यांनी हे आवाहन केले. संस्थेच्या वतीने अंध मुलींना संगणक आणि अन्य रोजगाराभिमुख प्रशिक्षण मोफत दिले जाते. या वर्गाचा समारोपही यावेळी करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सिडको येथील वावरे कॉलेजचे प्रा. एस. टी. घुले, नाशिकरोड येथील साईश्रद्धा हॉस्पिटलचे संचालक जितेंद्र आगळे, पत्रकार पद्माकर देशपांडे उपस्थित होते. यावेळी सहसचिव लोंढे, शिक्षक रत्ना भागवत उपस्थित होते.

Web Title: Voters should vote naturally,