सिन्नरला शासनाला कांदामाळ भेट

By Admin | Updated: August 24, 2016 22:11 IST2016-08-24T22:01:44+5:302016-08-24T22:11:58+5:30

सिन्नरला शासनाला कांदामाळ भेट

Visit to Sinnar to the government | सिन्नरला शासनाला कांदामाळ भेट

सिन्नरला शासनाला कांदामाळ भेट

 सिन्नर : कांदा पिकाला कवडीमोल भाव मिळत असताना शासन
याकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ सिन्नर तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर कांदाफेक आंदोलन करून शासनाला कांदामाळ भेट देण्यात आली.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर कांदाफेक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन बर्डे,
राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे डॉ. विष्णू अत्रे, डी. डी. गोर्डे यांच्या नेतृत्त्वाखाली सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून शासनविरोधी घोषणा दिल्या. वारंवार रास्ता रोको आंदोलन करून व निवेदने देऊनही शासनाला जाग येत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. शासनाला कांदामाळ भेट देऊन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी युनूस शेख, रवींद्र जगताप, दीपक लहामगे, दगू
भुजबळ, प्रवीण जगताप, कल्पना रेवगडे, सुदाम शिरसाट, संदीप
शिंदे, संदीप दिघोळे, संजय काकड, सुदाम शिरसाट यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Visit to Sinnar to the government