नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांची मातोश्रीला भेट

By Admin | Updated: May 18, 2014 00:36 IST2014-05-17T23:52:17+5:302014-05-18T00:36:01+5:30

देवळाली कॅम्प : नाशिक लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे मातब्बर उमेदवार छगन भुजबळ यांना पराभूत करणारे शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांनी आज सकाळी मातोश्रीवर जाऊन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Visit to Matoshree, newly elected MP Hemant Godse | नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांची मातोश्रीला भेट

नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांची मातोश्रीला भेट

देवळाली कॅम्प : नाशिक लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे मातब्बर उमेदवार छगन भुजबळ यांना पराभूत करणारे शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांनी आज सकाळी मातोश्रीवर जाऊन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी निकाल जाहीर होऊन राज्यातील महायुतीने अभूतपूर्व यश संपादन केले. शिवसेनेचे १७ उमेदवार निवडून आले. त्यात नाशिकचे हेमंत गोडसे यांचाही समावेश आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर नाशिक परिसरात ठिकठिकाणी जल्लोष केल्यानंतर आज सकाळी हेमंत गोडसे यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह मातोश्री गाठली आणि पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी, कामाला लागा, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशरल राहा, असे सांगत लवकरच विजयी सभा घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, आमदार बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महापालिकेतील विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, नगरसेवक विलास शिंदे, शिवाजी सहाणे, डी. जी. सूर्यवंशी, शैलेश ढगे, सचिन मराठे, मामा ठाकरे, देवानंद बिरारी, गौरख खर्जुल आदि उपस्थित होते.

फोटो :

Web Title: Visit to Matoshree, newly elected MP Hemant Godse