शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकरोडवरील अपघातांमुळे ग्रामस्थ त्रस्त

By admin | Updated: December 21, 2015 23:01 IST

उपाययोजना करा : जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

सातपूर : गेल्या वर्षभरात नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर (त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत) तब्बल ६० मोठे अपघात झाले असून, त्या अपघातांमध्ये ४६ जण गंभीर जखमी होऊन त्यांना अपंगत्व आले आहे, तर उर्वरित १४ जणांना आपला जीव गमवावा लागल्याचे उघडकीस आले आहे. हे अपघात थांबविण्यासाठी आणि वेगावर नियंत्रण आणण्यासाठी या रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक आणि पथदीप बसविण्याची मागणी रस्त्याच्या लगत असलेल्या गावांतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.त्र्यंबकेश्वर रस्ता चौपदरीकरण करून वर्ष झाले आहे. या रस्त्यावर होणारी वाहतूक दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. तसेच या रस्त्यावर अनेक नामांकित महाविद्यालये, शिक्षणसंस्था असल्यामुळे हजारो विद्यार्थी तसेच कर्मचारी वर्ग, शिक्षक वर्ग त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी वाढत आहे. हा रस्ता नवीन व मोठा असल्याने वाहनांच्या वेगावर मर्यादा नसते म्हणून या रस्त्यावर गेल्या वर्षभरात ६० मोठे अपघात आणि १४ जण मृत्युमुखी पडले आहेत. रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे हे अपघात झालेले आहेत. भविष्यात असे अपघात होऊ नयेत म्हणून या रस्त्यावर जेथे दुभाजक आहे व ज्या गावाकडे रस्ता वळतो अशा गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावेत व तेथे पथदीप बसविण्यात यावेत, अशी मागणी रमेश खांडबहाले, अ‍ॅण्ड. प्रभाकर खराटे, दीपक वाघ, कैलास चव्हाण, तुकाराम दाते, ज्ञानेश्वर मोरे, कैलास मोरे, राजू बदादे, शंकर चव्हाण, नामदेव चव्हाण, मधुकर खराटे, रामदास दाते, यशवंत महाले, काशीनाथ खेटरे, बाळासाहेब डगळे, श्याम ढगे, एकनाथ खांडबहाले, नवनाथ कोठुळे, उमेश मोरे, एकनाथ शिंदे आदि त्रिंबक विद्यामंदिर, वासाळी, बेळगावढगा, महिरावणी, तळेगाव, खंबाळा, वाढोली, बेझे, अंजनेरी, तळवाडे, पेगलवाडी या गावांतील सरंपच, उपसरंपच, ग्रापंचायत सदस्य, सर्व पक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)