शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विजया जाधव यांचे सदस्यत्व रद्द

By admin | Updated: November 13, 2014 00:06 IST

विजया जाधव यांचे सदस्यत्व रद्द

सिन्नर : पक्षादेशाचे उघडपणे उल्लंघन केल्याप्रकरणी सिन्नर पंचायत समितीच्या माजी उपसभापती व माळेगाव गणाच्या विद्यमान सदस्य विजया संजय जाधव यांचे पंचायत समिती सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिला आहे.विजया जाधव या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून माळेगाव गणातून पंचायत समिती सदस्य म्हणून विजयी झाल्या होत्या. पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली १४ मार्च २०१२ रोजी पंचायत समिती सदस्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या निवडीप्रसंगी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सदस्यांनी बैठकीस हजर राहून पक्षाचे उमेदवार प्रकाश कदम यांना मतदान करावे, असा लेखी पक्षादेश सर्व सदस्यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेता उदय सांगळे यांनी बजावला होता. सौ. जाधव यांची पक्षादेश बजावल्याची स्वाक्षरीही घेण्यात आली होती. याशिवाय सौ. जाधव यांच्या राहत्या घराचे दर्शनी दरवाज्यावर पक्षादेशाची प्रत चिकटविण्यात आली होती. जाधव या बैठकीला गैरहजर राहिल्याने त्यांनी पक्षादेश डावलल्याची तक्रार पंचायत समितीचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेते सांगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. सदर दाव्याची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू होती. याची सुनावणी पूर्ण झाली. त्यात सौ. जाधव या महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६चे कलम ३ नुसार राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सिन्नर तालुका पंचायत समितीचे गटनेते यांनी त्यांच्यावर काढलेला व्हीप (पक्षादेश)चे उघडपणे उल्लंघन केल्याचे सिध्द झाले. त्या कारणाने या कायद्याच्या कलम ३नुसार त्यांचे पंचायत समिती सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी सदर आदेशाची प्रत राष्ट्रवादीचे गटनेते सांगळे व सौ. जाधव यांना तत्काळ बजावून बजावणी अहवाल सादर करण्याचे आदेश निकालपत्रात देण्यात आले आहे. अ‍ॅड. आनंद जगताप यांनी उदय सांगळे यांच्यावतीने बाजू मांडली. (वार्ताहर)