VIDEO : विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडीचे स्वागत

By Admin | Updated: January 20, 2017 14:44 IST2017-01-20T14:33:56+5:302017-01-20T14:44:54+5:30

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 20 -  हातात दिंडी पताका, मुखात विठू नाम, आकर्षक सजवलेली पालखी अन् टाळ मृदुंगाचा जयघोषात ...

VIDEO: Welcome Dindi to Lord Vithal | VIDEO : विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडीचे स्वागत

VIDEO : विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडीचे स्वागत

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 20 -  हातात दिंडी पताका, मुखात विठू नाम, आकर्षक सजवलेली पालखी अन् टाळ मृदुंगाचा जयघोषात विठ्ठल नामाच्या गजराने तालुक्याच्या पूर्वभागातील संपूर्ण परिसर उल्हासित झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या पायी पालखीचे बेलगाव कुऱ्हे येथे मोठया भक्तिभावाने उत्साहात प्रस्थान झाले. 
 
त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी पायी दिंडीत महिलांसह तरुणांनीही मोठया प्रमाणात सहभाग नोंदवला. संत निवृत्ती महाराज यांच्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे अहमदनगर जिल्ह्यातून दर्शनासाठी दिंड्या मोठ्या प्रमाणात येतात. 
 
बेलगाव कुऱ्हे परिसरात अनेक दिंड्याचा मुक्काम असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावाने त्र्यंबकेश्वर येथे अनेक दिंड्या मार्गस्थ झाल्या. प्रस्थानाच्या पूर्वसंध्येला संतांचे अभंग, हरिपाठ आदींनी टाळ मृदूंगाच्या गजरात अनेक वारकरी बेधुंद नाचत होते.
 

https://www.dailymotion.com/video/x844oqf

Web Title: VIDEO: Welcome Dindi to Lord Vithal