शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा आर्थिक संकटात

By admin | Updated: September 29, 2016 01:38 IST

शेतकऱ्यांची फरपट : भाजीपाला जनावरांना चारण्याची वेळ

नायगाव : सध्या बाजारात सर्वच शेतमालाचे भाव गडगडल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याने शेतकऱ्यांचा चांगलाच वांदा केला आहे. दिवसागणीक कमी होत गेलेल्या बाजारभावाने शेतकऱ्यांना चांगलेच आर्थिक अडचणीत आणले, तर काही शेतकऱ्यांचा पिकवलेला कांदा चाळीत सडल्याने तो बाहेर काढण्यासही पैसे मोजावे लागण्याची नामुष्की यंदा शेतकऱ्यांवर ओढवली आहे. सध्या बाजारात येत असलेल्या सर्वच पालेभाज्या व इतर पिकांना कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. कोबी, फ्लॉवर, टमाटे आदि महागड्या पिकांना दीड ते दोन रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे. या बाजारभावामध्ये उत्पादन खर्च तर दूरच, तो बाजारात आणण्यासाठी येणारा खर्चही हातात पडत नसल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. मेथी, शेपू, कोथिंबीर, भेंडी, मिरची आदि पालेभाज्या बाजारात सध्या विक्रीअभावी जागेवरच सोडून जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी हा भाजीपाला शेतातच जनावरांना चारल्याचे, तर काही शेतकऱ्यांनी पिकांवर नांगर फिरवल्याचे चित्र नायगाव खोऱ्यात दिसत आहे. कोबी, टमाटे, फ्लॉवर आदि पिकांसाठी महागडी औषधे, फवारणी, मजुरी, खते आदिंचा मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. मात्र, ही सर्व पिके सध्या व्यापारी मातीमोल भावात खरेदी करत आहे. नायगाव भागात कोबी व टमाटे या दोन्ही पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. यात कोबी एक ते दीड रुपया किलोने, तर विविध रोगांच्या तडाख्यात कसेबसे बचावलेले टमाट्याचे पीकही कवडीमोल भावाने विकावे लागत आहे. अशा या सर्वच पिकांचे भाव मातीमोल झाल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. महागड्या पिकांच्या लागवड खर्चाने शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. संपूर्ण वर्षभर या ना त्या कारणांनी शेतकरी आर्थिक संकटात अडकत गेला आहे. कांद्यापाठोपाठ सर्वच पिकांना कवडीमोल भाव मिळत असताना शेतकऱ्यांची होणारी ही सध्याची परिस्थिती कोणत्याच प्रसारमाध्यमांना किंवा ग्राहकांना दिसत नाही का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. उत्पादन खर्च फिटून चार पैसे बळीराजाच्या हातात पडायला लागले की मग मात्र सर्वच स्तरांतून शेतकरीविरोधी आवाज उठतो व सरकार बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करते आणि ग्राहकांना न्याय देण्यासाठी बळीराजाला आर्थिक कोंडीत सापडवते. (वार्ताहर)