नोव्हेंबर महिन्यात वाढली वाहनांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:39 IST2020-12-04T04:39:47+5:302020-12-04T04:39:47+5:30

नवी दिल्ली : दिवाळी आणि गुरु नानक जयंतीसारखे सण असल्यामुळे नोव्हेंबर महिना हा वाहन कंपन्यांसाठी चांगला राहिला आहे. या ...

Vehicle sales increased in November | नोव्हेंबर महिन्यात वाढली वाहनांची विक्री

नोव्हेंबर महिन्यात वाढली वाहनांची विक्री

नवी दिल्ली : दिवाळी आणि गुरु नानक जयंतीसारखे सण असल्यामुळे नोव्हेंबर महिना हा वाहन कंपन्यांसाठी चांगला राहिला आहे. या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार आणि दुचाकींची खरेदी झाल्याचे जाहीर झालेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

कार उत्पादक कंपन्या मारुती सुझुकी, हुंडाई मोटर्स, महिंद्र ॲण्ड महिंद्र, किर्लोस्कर टोयोटा आदींसह जवळपास सर्वच कंपन्यांची विक्री नोव्हेंबर महिन्यामध्ये वाढली आहे. त्याचप्रमाणे बजाज, हीरो, टीव्हीएस अशा दुचाकी उत्पादकांच्या विक्रीमध्येही चांगली वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुतीची विक्री थोडीच वाढली असली तरी ह्युंडाईने मात्र सर्वात जास्त मासिक विक्री नोंदविली आहे. त्याचप्रमाणे महिंद्र ॲण्ड महिंद्र, होंडा कार्स, टोयोटा किर्लोस्कर यांची विक्रीही गत महिन्यामध्ये चांगलीच वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

Web Title: Vehicle sales increased in November