शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये बालदिनानिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:57 IST

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील अनेक शाळांमध्ये वेशभूषा स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

नाशिक : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील अनेक शाळांमध्ये वेशभूषा स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विविध सामाजिक संस्था संघटनाच्या वतीनेही पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.के. के. वाघ इंग्लिश स्कूल डीजीपीनगर येथे बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत विविध गीते, नृत्य, खेळ सादर करण्यात आलो. यात विद्यार्थ्यांनी बालगीतांचे समूह गायन केले. यावेळी मुख्याध्यापक चित्रा नरवाडे, सना शेख, रविना पवार आदी उपस्थित होते.पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती राष्ट्रवादी भवन येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दिंडोरी लोकसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या विकासाचा खरा पाया रचला गेला. त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी भारताची अर्थव्यवस्था सक्षम बनविण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले व या निर्णयांमुळेच भारत प्रगतिपथावर वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी नाशिक लोकसभा अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, अनिता भामरे, अंबादास खैरे, गौरव वाघ, चंद्रकांत साडे, मनोहर बोराडे, अ‍ॅड.चिन्मय गाढे, नीलेश सानप, डॉ.संदीप चव्हाण, रेहान शेख उपस्थित होते.पुष्पा हिरे प्राथमिक विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपशिक्षक खैरनार हे होते. यावेळी मुख्याध्यापक त्रिभुवन यांनी नेहरु ंच्या जीवनाविषयी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी गायन व नृत्य सादर केले. सूत्रसंचालन उपशिक्षक सी. आर. हिरे यांनी, तर आभार देसले यांनी मानले.महापालिकेत पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पणमहानगरपालिकेच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शालिमार चौक येथील नेहरू उद्यानातील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे, गटनेते शाहू खैरे, गजानन शेलार, दीक्षा लोंढे, नगरसेविका वत्सला खैरे, उपायुक्त अर्चना तांबे, सहायक आयुक्त जयश्री सोनवणे, विभागीय अधिकारी हेमंत पाटील, उद्यान निरीक्षक रमेश भालेराव, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभिरे, संतोष कान्हे आदी उपस्थित होते.

टॅग्स :children's dayबालदिनNashikनाशिक