Vantaye first in the drama festival | नाट्योत्सव स्पर्धेत ‘वैनतेय’ प्रथम
निफाड तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत प्रथम क्र मांक मिळविलेल्या वैनतेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करताना प्राचार्या मालती वाघावकर, उपप्राचार्य डी.बी. वाघ. समवेत बी.आर. सोनवणे, सौ. एम.डी. वाघ आदी.

निफाड : तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत वैनतेय विद्यालयाने प्रथम क्र मांक पटकावला. वैनतेय विद्यालयात तालुका विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी तुंगार यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत १३ शाळांनी सहभाग घेतला. व्यासपीठावर निफाडचे गटशिक्षणाधिकारी के.व्ही. तुंगार, विस्तार अधिकारी एस.बी. थोरात, वैनतेय विद्यालयाच्या प्राचार्य मालती वाघवकर, उपप्राचार्य डी.बी. वाघ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विज्ञान विभागप्रमुख बी.आर. सोनवणे यांनी केले. स्पर्धेत वैनतेय विद्यालयाचा प्रथम क्र मांक आला. वैनतेय विद्यालयाच्या आदिती बागडे, गीतांजली मराठे, स्नेहल गोसावी, तनिष्का लोंढे, सार्थक कापसे, कृष्णा कापसे, सात्त्विक सानप, आदित्य केदार या विद्यार्थ्यांनी स्वच्छता, स्वास्थ्य व आरोग्य या विषयावर नाटिका सादर केली. या नाटिकेद्वारे या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छता , सार्वजनिक स्वच्छता, शौचालयाचे महत्त्व नाटिकेद्वारे पटवून दिले. या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक एम. डी. वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत द्वितीय क्र मांक पिंपळगाव बसवंत येथील कै. मा.ल. कन्या विद्यालय, तर तृतीय क्र मांक भाऊसाहेबनगर येथील गीताई कन्या विद्यालय आणि ओझर मिग येथील कै. माधवराव बोरस्ते विद्यालयाचा आला. वैनतेय विद्यालयाच्या प्राचार्य मालती वाघावकर, उपप्राचार्य डी.बी. वाघ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. सौ. व्ही.आर. कुलकर्णी, पी.पी. पवार यांनी काम पाहिले. प्रास्ताविक बी.आर. सोनवणे यांनी केले.

Web Title: Vantaye first in the drama festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.