शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांची बारा लाखांची फसवणूक

By admin | Updated: February 20, 2017 22:58 IST

आमिष : मंत्रालयात ओळख असल्याची बतावणी

नाशिक : मंत्रालयात ओळख असल्याचे सांगत एलआयसी व एमएसव्हीई कार्पोरेशनमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अमरावती येथील संशयित अभिजीत ग. काळमेघ (३२ रा. योगीराज कॉलनी, तपोवन विद्यापीठ, अमरावती) याने बेरोजगारांना बारा लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, यामध्ये अनेक बेरोजगार तसेच फसवणुकीच्या तक्रारींची संख्या वाढण्याची शक्यता आहे़  प्रदीपसिंग उत्तमसिंग ओनावळे (थर्मल पॉवर स्टेशन, सामनगाव, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २०१५ मध्ये त्यांची पुतणी व इतर बेरोजगारांशी काळमेघची भेट झाली़ त्याने मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून एलआयसी तसेच एमएसव्ही कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले़ त्यानुसार या बेरोजगारांनी त्यास नोकरीसाठी १२ लाख रुपये दिले़ मात्र सांगितलेला कालावधी उलटूनही नोकरी न मिळाल्याने तसेच दिलेले पैसेही परत मिळत नसल्याने ओनावळे यांनी न्यायालयात खासगी दावा दाखल केला होता़  या दाव्यावर न्यायालयामध्ये नुकतीच सुनावणी पूर्ण होऊन संशयित काळमेघ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते़ त्यानुसार नाशिकरोड पोलिसानी संशयित अभिजित काळमेघविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)पायी जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र खेचलेनाशिक : रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या संशयिताने खेचून नेल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास नाशिकरोडच्या मोटवाणी रोडवर घडली़ उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योती दीपक श्रोत्रिय (५६, रा़ अनुबंध सोसायटी, सिंहगडरोड, पानमळा, पुणे) या सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मोटवाणीरोडवरील उत्सव मंगल कार्यालयाकडून पायी जात होत्या़ त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले़ या प्रकरणी श्रोत्रिय यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़