शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

हिरावाडी पाटाजवळ मृत जनावरे फेकण्याचे प्रकार

By admin | Updated: July 31, 2014 00:52 IST

कारवाईची मागणी : नागरिकांना करावा लागतो दुर्गंधीचा सामना

पंचवटी : हिरावाडी परिसरात गायी, म्हशींचे गोठे थाटून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या काठेवाडी नागरिकांकडून मृत जनावरे हिरावाडीतील पाण्याच्या पाटालगत फेकून दिली जात असल्याने येथील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. मृत जनावरे पाटालगत फेकणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी हिरावाडीतील नागरिकांनी केली आहे. हिरावाडीतील कमलनगर, क्रीडा संकुल परिसरात काही काठेवाडी नागरिक राहत असून, हे नागरिक दुग्ध व्यवसाय करतात. एखाद्या आजाराने त्यांच्याजवळील गाय, म्हैस मृत झाली तर ते रात्रीच्या वेळी बैलगाडीत मृत जनावर टाकून हिरावाडी परिसरात असलेल्या पाण्याच्या पाटाजवळ आणून टाकतात. परिणामी येथील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, आरोग्य धोक्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मृत जनावरे उघड्यावर फेकून दुर्गंधी पसरविणाऱ्या तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या काठेवाडी नागरिकांविरुद्ध महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई करावी, अशी मागणी हिरावाडी परिसरातील नागरिकांनी केली आहे. मृत जनावरांमुळे मोकाट श्वानांचाही उपद्रव वाढला असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे मृत जनावरे पाटालगत फेकण्याचे प्रकार सुरू झाले होते; मात्र त्यावेळी नागरिकांनी पंचवटी विभागीय कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र आता प्रशासनाचे पुन्हा दुर्लक्ष झाल्याने परिस्थिती ‘जैसे थे’ निर्माण झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. (वार्ताहर)