शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी अर्ज भरताना दुचाकी रॅली

By admin | Updated: September 28, 2014 00:35 IST

उमेदवारी अर्ज भरताना दुचाकी रॅली

नाशिक : उमेदवारी अर्ज भरताना दुचाकी रॅली काढून त्यामध्ये निळ्या रंगाचा ध्वज फडकावणे तसेच रिक्षाच्या पाठीमागे उमेदवाराचे पोस्टर लावून फिरणाऱ्या रिक्षाचालकावर भद्रकाली पोलीस ठाण्यात आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ नाशिक पूर्वमधील चंद्रकांत लवटे, तर देवळालीतील पवन पवार यांचे हे दोघे समर्थक आहेत़ या दोघांचीही वाहने पोलिसांनी जमा केली आहेत.नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणारे चंद्रकांत लवटे यांचा समर्थक मेघराज प्रदीप देशमुख (देवळालीगाव, नाशिकरोड) हा दुचाकीवर (एमएच १८, व्ही-१९०८) निळ्या रंगाचा ध्वज लावून शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बी़ डी़ भालेकर मैदान परिसरात फिरत होता़ त्याने ध्वज लावण्याबाबत कुठलीही परवानगी घेतली नसल्याने भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक किशोर खिल्लारे यांनी आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून दुचाकी जप्त केली आहे़नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले पवन पवार यांचा समर्थक जिशान सलीम सय्यद या रिक्षाचालकाने रिक्षाच्या (एमएच १५, झेड-१०५१) पाठीमागे पवार यांचा फोटो व त्यावर आपला माणूस असे पोस्टर लावून द्वारका ते सारडा सर्कल परिसरात सकाळच्या सुमारास फिरत होता़ विनापरवानगी पोस्टर लावून फिरणाऱ्या सय्यदविरोधात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)