शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपूलावरील अपघातात दोघे ठार

By admin | Updated: March 11, 2017 14:58 IST

द्वारका उड्डाण पुलावर मध्यरात्री झालेल्या ट्रकच्या भीषण अपघातात तीन जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर आहे.

 नाशिक : शनिवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास द्वारका येथे उड्डाणपूलावर झालेल्या ट्रकच्या भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहे. या अपघातात गंभीर जखमी असलेल्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओझरकडून नाशिककडे येणारा ट्रक ( एम.एच.१८ एए९९४८) हा उड्डाणपूलावर टायर पंक्चर झाल्याने नादुरूस्त झाला. त्यामुळे चालकाने उडडाणपूलावरील संरक्षक कठड्यालगत ट्रक उभा करुन टायर बदलण्याचे काम सुरू केले. यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रक ने (यूपी ७५एम५३५३)नादुरूस्त झालेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रकचे टायर खोलणाºया चालक, वाहकाचा जागीच मृत्यू झाला. मयत तरूणांपैकी एकाची ओळख पटली असून महेशसिंग गंगासिंग (२७) (रा.उंबरी मध्यप्रदेश) दुसºया मयत तरूणाचे वय २२ वर्षे असून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पाठीमागून धडक लेल्या ट्रकमध्ये बटाटा भरलेला होता व तो मुंबईकडे जात होता. घटनेची माहिती मिळताच राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या रुग्णवाहिका, पोलीस, क्रेन घटनास्थळी पोहचले. जखमींना तातडीने नाशिकच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या अशोक मांगीलाल चव्हाण (२५,रा. रुई) याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक अमजद अब्दुल शकूर यास ताब्यात घेतले आहे. मुंबई नाका पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.