आॅटो रिक्षासह दोन दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:58 AM2018-11-13T00:58:00+5:302018-11-13T00:58:28+5:30

शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असून, रविवारी (दि. ११) शहरातील विविध पोलीस ठाण्यांत वाहन चोरीच्या तीन घटनांची नोंद झाली आहे. यात पंचवटी परिसरातील मखमलाबाद येथून अज्ञात चोरट्यांनी आॅटो रिक्षा चोरून नेली.

Two motorcycle theft with auto rickshaw | आॅटो रिक्षासह दोन दुचाकींची चोरी

आॅटो रिक्षासह दोन दुचाकींची चोरी

Next

नाशिक : शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असून, रविवारी (दि. ११) शहरातील विविध पोलीस ठाण्यांत वाहन चोरीच्या तीन घटनांची नोंद झाली आहे. यात पंचवटी परिसरातील मखमलाबाद येथून अज्ञात चोरट्यांनी आॅटो रिक्षा चोरून नेली. तर महात्मानगर परिसरातून दुचाकी आणि पाथर्डी गौळाणे रोड परिसरातून एक स्कूटर चोरीला गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.
पंचवटीतील दिलीप वामन गवळी (५७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मखमलाबाद नाका भागातील काकड चाळ येथून
गुरुवारी (दि. ८) रात्री साडेदहा ते शुक्रवारी (दि.९) सकाळी सात वाजेदरम्यान आॅटो रिक्षा क्रमांक एमएच १५ एके ५६७० चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी चोरीची घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या रविवार-सोमवारच्या रात्री घडली. महात्मानगर येथील शिवशक्ती अपार्टमेंटच्या पार्किंगमधून रविवारी (दि. ४) रोजी चोरट्यांनी लाल रंगाची पल्सर चोरून नेल्याची फिर्याद सागर कुशल बेंडकुळे (२१) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
अ‍ॅक्टीव्हाची चोरी
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २९ आॅक्टोबरच्या रात्री सव्वासहा वाजेनंतर दुसऱ्या दिवशी पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास पाथर्डी-गौळाणे रोड परिसरातील ईश्वरी पॅराडाईजच्या पार्किंगमधून राखाडी रंगाची अ‍ॅक्टीव्हा मोपेड स्कूटर चोरीला गेली. याप्रकरणी माधुरी भाऊसाहेब पाटील यांनी रविवारी (दि. ११) दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. एस. जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Two motorcycle theft with auto rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.