शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जातपडताळणी मिळविण्यासाठी १२ वर्र्षे संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:15 IST

अनुसूचित जमातीच्या एका उमेदवारास जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तब्बल एक तपाचा कालावधी लागला आहे. क्षेत्रबंधनाचे कारण पुढे करीत उमेदवारास बारा वर्षे वंचित ठेवण्यात आले होते. न्यायालयाच्या दणक्यानंतर समितीने आता कुठे जातवैधता प्रमाणपत्र संबंधितास दिले आहे.

नाशिक : अनुसूचित जमातीच्या एका उमेदवारास जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तब्बल एक तपाचा कालावधी लागला आहे. क्षेत्रबंधनाचे कारण पुढे करीत उमेदवारास बारा वर्षे वंचित ठेवण्यात आले होते. न्यायालयाच्या दणक्यानंतर समितीने आता कुठे जातवैधता प्रमाणपत्र संबंधितास दिले आहे.  जयवंत दिलीप पवार यांनी २००६ मध्ये अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र मिळावे म्हणून जातपडताळणी समितीकडे अर्ज सादर केला होतो. मात्र त्यांचा अर्ज क्षेत्रबंधनाचे कारण दाखवून फेटाळून लावण्यात आला होता. उमेदवाराने न्यायालयात धाव घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयानेदेखील समितीचा निर्णय कायम राखला होता. क्षेत्रबंधन, राजकीय पार्श्वभूमी याचे कारण पुढे करीत जात पडताळणी समितीने तब्बल १२ वर्षांनी उमेदवारास जातवैधता प्रमाणपत्र अदा केले आहे. यामुळे जातपडताळणी समितीचा ढिम्म कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.जयवंत दिलीप पवार यांनी २००६ मध्ये अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळावे म्हणून सर्व कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतर जातपडताळणी समितीने त्यांचा अर्ज क्षेत्रबंधनाचे कारणं दाखवून फेटाळून दिला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयानेदेखील समितीचा निर्णय कायम राखला. यामुळे पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने जातवैधता प्रमाणपत्रासाठी क्षेत्रबंधनाची अट गरजेची नसल्याचे सांगून उच्च न्यायालयाने या याचिकेचा पुनर्विचार करावा, असे सांगितले. या निर्णयानंतर उच्च न्यायालयाने चार आठवड्यांमध्ये उमेदवारास प्रमाणपत्र देण्याचे आदेश समितीस सप्टेंबर २०१७ ला दिले.सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर न सुधारलेल्या जातपडताळणी समितीने दोन महिन्यांनंतर जातवैधता प्रमाणपत्र न दिल्याने उमेदवाराने सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. समितीनेदेखील उच्च न्यायालयाच्या निर्णयास आवाहन देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने समितीने दाखल केलेली याचिका खारीज करत उलट समितीची कानउघडणी केली. मात्र तरीदेखील उमेदवारास प्रमाणपत्र देण्यास समितीने ताटकळत ठेवले. आदिवासी विकास विभागाचे सचिव यांनीदेखील समितीस तातडीने प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. उमेदवाराने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले अवमान याचिकेच्या सुनावणी दरम्यान समितीस पुन्हा एकदा फटकारले जाईल पुन्हा समिती सदस्यांनी १८ जून २०१८ रोजी उमेदवारास बोलावून कार्यालयात जातवैधता प्रमाणपत्र अदा केले.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार