शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
5
ना बाजारात विकत, ना जेवणात वापरत, भारतीत एकमेव शहर, येथे  कांदा, लसुणीच्या वापरावर आहे पूर्ण बंदी
6
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
7
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
8
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
9
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
10
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
11
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
12
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
13
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
14
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
15
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
16
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
17
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
18
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
19
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
20
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या संकीर्ण कर विभागात चोरीचा प्रयत्न

By admin | Updated: March 30, 2017 23:01 IST

महापालिकेच्या संकीर्ण कर विभागातील महत्त्वाचे दस्तावेज चोरीचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे.

 अतुल शेवाळे मालेगावमहापालिकेच्या संकीर्ण कर विभागातील महत्त्वाचे दस्तावेज चोरीचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. या विभागाचे कुलूप व कपाट तोडून सामान अस्ताव्यस्त करण्यात आले. संबंधित विभागप्रमुखांनी किल्ला पोलिसांना माहिती व तक्रार नोंदविण्यास समर्थन दाखविल्यानंतरही पोलिसांनी काही चोरीला गेले नाही तर गुन्ह्याची नोंद का करता, असा सवाल उपस्थित करीत चोरांनाच पोलीस अप्रत्यक्षरीत्या अभय देत असल्याचा प्रकार घडला आहे.मालेगाव महापालिकेच्या संकीर्ण विभागात महत्त्वाचे दस्तावेज आहेत. मनपा मालकीचे व्यापारी गाळे भाडेतत्त्वावर दिल्यानंतर करारनामे व इतर कागदपत्रांच्या नोंदी असतात. गेल्या काही दिवसांपासून शहरातील व्यापारी गाळे भाडेतत्त्वावर देण्यावरून वाद सुरू आहेत. काही गाळेमालकांची चौकशीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी संकीर्ण कर विभागाच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील महत्त्वाच्या फाइली चाळून अस्ताव्यस्त केल्याचे उघड झाले आहे. मात्र या विभागाचे प्रमुख तथा सहायक आयुक्त अखलाक अहमद यांनी विषयांचे गांभीर्य ओळखत आठ दिवसांपूर्वी महत्त्वाच्या फाइली सुरक्षित स्थळी ठेवल्या होत्या. या घटनेची माहिती किल्ला पोलीस ठाण्याला दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कर्नावळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. या चोरीच्या प्रकाराबाबत मनपा उपआयुक्त अंबादास गर्कळ यांनी संबंधित विभागप्रमुखांना रीतसर फिर्याद देण्याची सूचना केली होती. तसेच घटनास्थळाच्या पाहणीदरम्यान उपआयुक्त गर्कळ उपस्थित होते. त्यानंतर संकीर्ण कर विभागाचे लिपिक केशव गंगावणे यांनी किल्ला पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याची तयारीही दाखवली होती. मात्र पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कर्नावळ यांनी पाहणी केल्यानंतर चोरी झालीच नसल्याचा जावईशोध लावला. मनपाच्या संकीर्ण कर विभागाच्या चोरीचा प्रयत्न होऊनही या प्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती. (प्रतिनिधी)