शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपातासाठी आदिवासींचे गुजरात कनेक्शन?; आरोग्य विभागाला संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 03:28 IST

सुरगाणा तालुक्यात माता-बालमृत्यूतही वाढ

नाशिक : आदिवासी सुरगाणा तालुक्यात महिला व बालमृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक असून, ते कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ‘फोकस सुरगाणा’ मोहीम हाती घेतली आहे. गुजरातमध्ये जाऊन महिलांचा गर्भपात केला जात असल्याचा संशय आरोग्य खात्याला असून, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांनी सुरगाण्याचे गुजरात कनेक्शन शोधण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आरोग्याच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच या तालुक्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण सातत्याने कमी होत असल्याचे लक्षात आले आहे. जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी असले तरी, सुरगाणा तालुक्यात मुलींचा जन्मदर सर्वात कमी हजारी ९०८ इतकाच आहे. मुलींचे घटते प्रमाण पाहता, आदिवासी समाजातही मुलगी नको असा मतप्रवाह निर्माण होतो की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली असावी.

तसेच गर्भपाताला प्रोत्साहन मिळत असल्याचा अंदाज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी व्यक्त केला आहे. तेथे गर्भपात करून देणारी यंत्रणा कार्यान्वित असावी असा आरोग्य खात्याला संशय आहे. सुरगाणा तालुक्यात बाळंतपणात महिला मृत्यूचे तर बालमृत्यूचे प्रमाणही अन्य तालुक्यांपेक्षा अधिक असून, या वर्षी १६९ मृत्यू झाले. त्यास प्रामुख्याने तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व दारूचे व्यसन या दोन्ही गोष्टी कारणीभूत असल्याचे लक्षात आले आहे.

टॅग्स :docterडॉक्टरNashikनाशिकPregnancyप्रेग्नंसीHealthआरोग्य