शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

पाथरेत वृक्ष संवर्धन पंधरवड्यानिमित्त वृक्ष लागवड

By admin | Updated: July 23, 2014 00:30 IST

पाथरेत वृक्ष संवर्धन पंधरवड्यानिमित्त वृक्ष लागवड

पाथरे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पाथरे येथे वृक्ष संवर्धन पंधरवडा विविध कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. यानिमित्ताने शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत येथे वृक्षलागवड करण्यात आली. या मोहिमेत प्रत्येक ग्रामपंचायतीने सहभागी होणे अपेक्षित असल्याने पाथरे बुद्रूक, पाथरे खुर्द व वारेगाव या ग्रामपंचायतींनी प्रत्येकी ५०० वृक्षांचे रोपण केले आहे. वारेगाव येथे पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेंतर्गत पाचशे वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याने शासनाच्या वतीने असे कार्यक्रम हाती घेण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यापूर्वी पाथरे येथील पाथरे बुद्रूक, पाथरे खुर्द व वारेगाव या ग्रामपंचायतींच्या वतीने सुमारे एक हजार पाचशे वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहितीही याप्रसंगी दिली. उन्हाळ्यातही रोपट्यांची काळजी घेऊन ग्रामपंचायतींच्या वतीने या वृक्षांचे संवर्धन करण्यात आले आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने वृक्षांचा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली. येथील तीनही ग्रामपंचायतींच्या वतीने एकत्रित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वृक्षसंवर्धन कार्यक्रमास पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी एम. के. वाघ, विस्तार अधिकारी एस. के. चौधरी, वारेगावचे ग्रामसेवक विजय मोरे, पाथरे बुद्रूकच्या ग्रामसेवक आशालता चौधरी आदिंनी विविध योजनांची माहिती दिली. यावेळी बाळासाहेब खळदकर, पाथरे रामनाथ चिने, मंदाताई बाविस्कर, गणेश सोमवंंशी, योगेश चिने, राजेंद्र गवळी आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)