शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

३० बेडच्या कोविड सेंटरमधे ४२ बाधितांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 00:45 IST

वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सतर्क प्रशासकीय यंत्रणेवर कामकाजाचा अतिरिक्त ताण पडत असला तरी वणीतील ३० बेडच्या कोविड सेंटरमध्ये ४२ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देवणीत आरोग्य यंत्रणा सज्ज, १८ ऑक्सिजन सिलिंडरद्वारे मदत

वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सतर्क प्रशासकीय यंत्रणेवर कामकाजाचा अतिरिक्त ताण पडत असला तरी वणीतील ३० बेडच्या कोविड सेंटरमध्ये ४२ बाधितांवर उपचार सुरू आहेत.दिंडोरी तालुक्यात शासनाचे एकमेव कोविड सेंटर वणी येथे कार्यान्वित आहे तर तालुक्यातील खासगी कोविड सेंटरची संख्या पाच अशी आहे. ५० बेड क्षमता असलेल्या कोविड सेंटरचे काम दिंडोरी येथील आयटीआयच्या इमारतीत सुरू करण्यासाठी प्रशासन सक्रिय आहे. लवकरच हे कोविड सेंटर कार्यान्वित होऊन तालुक्यातील बाधितांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सद्यस्थितीत वणीच्या कोविड सेंटरमधे ४२ बाधितांवर उपचार सुरू आहेत.१८ ऑक्सिजन सिलिंडरच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत. तर ड्युरा दोन जम्बो ऑक्सिजन यंत्रसामग्रीच्या माध्यमातून ऑक्सिजन उपलब्धतेनुसार उपचार प्रणाली करण्याबाबत आरोग्य विभाग कार्यरत आहे. रिझर्व ऑक्सिजन ठेवण्याच्या तरतुदीसाठी अखंडित ऑक्सिजन पुरवठा होणे अपेक्षित व गरजेचे आहे. दररोज दाखल रुग्णांची संख्या, त्यांची तपशीलवार माहिती, त्यांना लागणारा ऑक्सिजन व कालावधी तसेच नवीन दाखल प्रतीक्षा यादी रुग्णांची वास्तविक अवस्था ही सर्व माहिती जिल्हाधिकारी यांनी गठित केलेल्या समितीला पाठवून निर्णय प्रक्रिया राबविण्यात येते.  नाशिकच्या ऑक्सिजन टमधून सध्या रिफिलिंग ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात येतो.ऑक्सिजन तुटवडा होऊ नये म्हणून शासकीय कोविड सेंटरला प्राधान्य देण्यात येते.वणी कोविड सेंटरमधे बेड वाढविण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा अव्याहत सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. विधान सभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी औद्योगिक क्षेत्रातून ७५ ऑक्सिजन सिलिंडर प्रशासनाच्या माध्यमातून संकलित केले. मात्र सदरचे ऑक्सिजन सिलिंडर औद्योगिक वापराचे असल्याने त्या ऑक्सिजन क्लिनिंग प्रक्रिया पार पाडली.

ऑक्सिजन भरण्यापूर्वी अनुषंगिक तांत्रिक प्रक्रिया करावी लागणार आहे. वणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र बागुल,  समीर पाटील, तुषार पाटील, समीर देशमुख, प्रकाश देशमुख, अश्विनी जाधव, प्रियांका भुजबळ, गौरी निरहाली आदी परिश्रम घेत आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या