साताळी ग्रामपंचायतीत परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 17:27 IST2021-01-21T17:26:25+5:302021-01-21T17:27:16+5:30

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील सातळी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सात जागांपैकी सहा जागांवर परिवर्तन पॅनलचे उमेदवारांनी बाजी मारून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले तर ग्रामविकास पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

Transformation in Satali Gram Panchayat | साताळी ग्रामपंचायतीत परिवर्तन

येवला तालुक्यातील साताळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचा सत्कार करताना मारुती पवार, संभाजी पवार.

ठळक मुद्दे ग्रामविकास पॅनलला केवळ एका जागेवर समाधान

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील सातळी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सात जागांपैकी सहा जागांवर परिवर्तन पॅनलचे उमेदवारांनी बाजी मारून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले तर ग्रामविकास पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

प्रा. अर्जुन कोकाटे, मच्छिंद्र काळे, दिलीप काळे, भिका भाऊ सोनवणे, नानाभाऊ कोकाटे, भाऊसाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलला वॉर्ड क्रमांक एक मधून अमोल सोनवणे, सुनीता कोकाटे, वॉर्ड क्रमांक दोन मधून सुखदेव काळे, संगीता जगताप तर वॉर्ड क्रमांक तीनमधून गणेश कोकाटे, सुनंदा काळे हे परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडून आले, तर तुळशीराम कोकाटे, दत्ता काळे, गोरख काळे, भाऊसाहेब कळस्कर, पोपट आहेर यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनेलला वॉर्ड क्रमांक एक मधून सुनंदा कोकाटे ह्या एकमेव उमेदवार निवडून आल्या.

Web Title: Transformation in Satali Gram Panchayat