शहरं
Join us  
Trending Stories
1
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
2
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
3
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
4
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
5
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
6
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
7
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
8
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
9
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
10
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
11
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
12
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
13
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
14
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
15
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
16
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
17
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
18
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
19
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
20
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यानेच केल्या परस्पर बदल्या

By admin | Updated: September 6, 2016 01:54 IST

निफाडचे प्रकरण : प्रतिनियुक्त्यांचे आदेश वादात सापडण्याची चिन्हे

नाशिक : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रजा मंजुरीच्या घोटाळ्याने वादात सापडलेला जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आता विभागीय आयुक्तांना बदल्यांचे अधिकार असताना निफाडच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोेघा आरोग्यसेविकांच्या १ सप्टेंबरला परस्पर बदल्या केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.३१ मेनंतर सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही कारणास्तव बदल्या करण्याचे अधिकार हे विभागीय आयुक्तांना असताना निफाडच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पालखेड व चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोघा आरोग्यसेविकांची परस्पर प्रतिनियुक्त्यांचे काढलेले आदेश आता वादात सापडण्याची चिन्हे आहेत. वस्तुत: १५ दिवसांपुरता तात्पुरत्या स्वरूपात बदलीचा अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना काही अति महत्त्वाच्या तातडीच्या प्रसंगी आहे. मात्र १ सप्टेंबर २०१६ रोजी निफाडचे तालुका वैद्यकीय अधिकारी नवलसिंग चव्हाण यांनी दोघा आरोग्यसेविकांच्या पालखेड व चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रतिनियुक्ती स्वरूपात बदल्यांचे आदेश काढले आहेत. चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत खेरवाडी उपकेंद्रात कार्यरत असलेली आरोग्यसेविका प्रमिला पोपटराव नवले यांची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत जावक क्रमांक, आरोग्य ता.वै.अ./५८/१६ च्या १ सप्टेंबरच्या आदेशान्वये पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पिंपळगाव ब-२ उपकेंद्रांत रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्ती देण्याचे आदेश काढले आहेत. तसेच पालखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शिरवाडे वणी उपकेंद्रात कार्यरत श्रीमती ए. बी. ठाणेकर या आरोग्य सेविकेची जा.क्र./आरोग्य.ता.वै.अ./५९/१६ च्या १ सप्टेबर २०१६ च्या आदेशान्वये पालखेड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दावचवाडी येथील उपकेंद्रातील रिक्त पदावर प्रतिनियुक्ती देण्याचे आदेश काढले आहेत. बदली तात्पुरत्या स्वरूपातील प्रतिनियुक्तीच्या स्वरूपात असली तरी बदली झालेल्या आरोग्यसेविकांना त्यांच्याकडील आर्थिक व भौतिक अधिकारांचे हस्तांतर करण्याचेही या बदलीच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. वास्तविक पाहता जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांच्या कायद्यानुसार ३१ मेनंतर बदल्या अथवा प्रतिनियुक्त्या करण्याचे अधिकार फक्त विभागीय आयुक्तांना असताना सप्टेंबरमध्ये तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात या बदल्या केल्याने आरोग्य विभाग पुन्हा चर्चेत आला आहे. (प्रतिनिधी)