शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबक पालिकेच्या कचरा डेपोचा प्रश्न मार्गी

By admin | Updated: December 2, 2014 01:07 IST

४ डिसेंबरला मिळणार जागेचा ताबा

त्र्यंबकेश्वर : गेल्या अनेक वर्षांपासून गाजत असलेला त्र्यंबक पालिकेचा घनकचरा प्रश्न अखेर सुटला असून, येत्या ४ डिसेंबर रोजी सरकारी मोजणी होऊन पालिकेच्या ताब्यात निश्चित केलेली जागा मिळणार असल्याचे समजते. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून ही जागा ताब्यात मिळत आहे. त्र्यंबक शहराची वाढती लोकसंख्या, येणाऱ्या भाविकांचा दर्शनाचा लोंढा यामुळे नित्यनियमाने १५ टनापर्यंत घनकचरा शहराबाहेर फेकला जातो. तथापि गेल्या सुमारे शतकापासून अस्तित्वात असलेल्या सध्याच्या कचरा डेपो फुल्ल झाला असून, डेपो शहरातील नागरी वस्तीत आला आहे. परिणामी कचरा टाकण्यास जागाच शिल्लक नाही त्यामुळे पर्यायी जागेचा शोध सुरू होता. २००८मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी पेरियास्वामी चोक्कलिंगम यांनी कोजुळी, ता. त्र्यंबकेश्वर येथील सरकारी जागा गट क्र. ४९ सुमारे तीन हेक्टर जागा (सुमारे ७।। एकर) त्र्यंबक नगरपालिकेला सुपूर्द केली. प्रस्तुत जागा पहिले ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आहे. प्राथमिक कोर्टकचेरी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली तरीही प्रकरण थेट उच्च न्यायालयापर्यंत गेले. तथापि न्यायालयीन प्रक्रि येनंतर अखेर पालिकेच्या बाजूने कौल दिला. पालिकेने प्रकरण सामंजस्याने घेऊन गावकऱ्यांशी चर्चा करून या भागातील प्रतिष्ठित ग्रामस्थांना घेऊन पुणे येथे घनकचरा प्रकल्पाची माहिती प्रत्यक्ष दाखविली. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी नियोजित डेपोची प्रत्यक्ष पाहणी केली. जवळ असलेल्या श्ेतीची दूरवरील जलसाठ्याची पाहणी करून या डेपोपासून कुठलीही अडचण व धोका नाही असा अहवाल दिला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हिरवा कंदील दिला. सध्याच्या कचऱ्यापासून काय प्रक्रिया करता येईल, याबाबत प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे जागा ताब्यात घेतल्याबरोबर लगेच कचरा आणून टाकता येईल असे नाही. अगोदर भिंतीचे कंपाउण्ड बांधून जागा स्वच्छ करून नंतरच कचरा टाकता येईल. अर्थात या प्रक्रियेत विलंब लागणार आहे. तसेच गाव ते डेपोची जागा हे बरेच अंतर आहे. त्यामुळे डेपोपासून कोणालाही त्रास होणार नाही असेही सांगण्यात आले. स्थानिक गावकऱ्यांनी पालिकेस सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या बंदोबस्तात जागेचा ताबा स्वत: प्रांतधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, पालिकेचे अधिकारी, नगर भूमापन अधिकारी मोजणी करून ताब्यात घेतील. बुधवारी पहिणे व परिसरातील लगतच्या शेतकऱ्यांना येत्या ४ डिसेंबरला सरकारी मोजणीसाठी उपस्थित राहणेबाबत अधीक्षक, नगर भूमापन यांच्या स्वाक्षरीने नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे ते उपस्थित राहतील, असे समजते.