शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सुविधांअभावी पर्यटकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:16 IST

वैतरणा धरण परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र परिसरात पर्यटकांसाठी सोयीसुविधा नसल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. परिसरात सोयीसुविधा करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

ठळक मुद्देवैतरणा धरण परिसर : दर्शक फलक नसल्याने नाराजी

वैतरणानगर : वैतरणा धरण परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र परिसरात पर्यटकांसाठी सोयीसुविधा नसल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. परिसरात सोयीसुविधा करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.महाराष्ट्रातील नामवंत धरण म्हणून वैतरणा धरण प्रसिद्ध आहे. याठिकाणी पर्यटनाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देत असतात. मात्र परिसरात पर्यटकांना आवश्यक सोयीसुविधा, प्रसाधनगृह, पर्यटनाचे दिशादर्शक फलक नसल्याने येथे येणारे पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. यामुळे वैतरणा धरण परिसरात येणारे पर्यटकांमध्ये दिवसेंदिवस घट होत असल्याचे चित्र दिसत आहे.१९६२ साली वैतरणा धरणासाठी जमिनी संपादित करण्यात आल्या. १९७२ साली धरणाचे काम पूर्ण झाले. परंतु गेल्या पन्नास वर्षात संपूर्ण वैतरणा परिसरात कुठल्याही सोयीसुविधा करण्यात आलेल्या नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील बहुतांशी धरण परिसरांचा योग्य तो विकास झाला आहे.पर्यटकांसाठी सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाºया या महत्ताच्या अप्पर वैतरणा धरण परिसराचा विकास गेल्या पन्नास वर्षांपासून आजतागायत झालेला नाही. मुबलक पाणीसाठा असल्याने वैतरणा परिसराचा विकास होणे गरजेचे असताना हा परिसर उपेक्षित राहिला आहे.वैतरणा धरण परिसराला नैसर्गिक सौंदर्य भरभरून लाभलेले आहे. धरण, डोंगररांगा, जंगल आदी नैसर्गिक धनसंपदा लाभलेली आहे. या अनुषंगाने आजपर्यंत अपेक्षित सुधारणा झालेल्या नसल्याने पर्यटक या परिसरात येऊन नाराजी व्यक्त करताना दिसतआहेत.प्रतिक्रि यावैतरणा धरण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, मात्र येथे येणाºया पर्यटकांना योग्य सुविधा मिळत नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असतो. परीसरात कुठेही प्रसाधान गृह नसल्याने महिलांची गैरसोय होत असते. धरण परीसरात ठिकठिकाणी प्रसाधन गृह उभारणे गरजेचे आहे.- विष्णु पा. पोरजे(फोटो २३ वैतरणा)

टॅग्स :Damधरणdam tourismधरण पर्यटन