तिऱ्हळ आरोग्यकेंद्र रामभरोसे

By Admin | Updated: September 30, 2014 21:51 IST2014-09-30T21:51:02+5:302014-09-30T21:51:16+5:30

तिऱ्हळ आरोग्यकेंद्र रामभरोसे

Tirath Health Center Ram Bharose | तिऱ्हळ आरोग्यकेंद्र रामभरोसे

तिऱ्हळ आरोग्यकेंद्र रामभरोसे

कनाशी : कळवण तालुक्यातील तिऱ्हळ प्राथमिक आरोग्यकेंद्रात रिक्त असलेल्या पदामुळे आरोग्यसेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे सदर आरोग्य केंद्राचा रामभरोसे कारभाराचा फटका रुग्णांना बसत आहे. त्यामुळे तीव्र नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
तिऱ्हळ प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी असून, दुसरे वैद्यकीय अधिकारी एका वर्षापासून गैरहजर आहेत तसेच देसगाव व देवळीकर या गावातील उपकेंद्रातील आरोग्यसेवक पदे रिक्त आहेत. देवळीवणी येथील आरोग्यसेवक तीन महिन्यापासून कामावरून बेपत्ता आहे. सदर भाग हा आदिवासी असल्यामुळे विविध कर्मचारी व आधिकारी कित्येक दिवस बेपत्ता असतात, तर बरेच कर्मचारी दांडीबहाद्दर असून, त्याच्यावर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात नाही. मात्र वेळेवर पगार काढले जातात. सदर कर्मचाऱ्यांवर तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाचा कृपाशीर्वाद असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. सदर भाग आदिवासी असून, आवो जावो घर तुमारा अशी येथील परिस्थिती झाली आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात
आहे.
बरेच कर्मचारी दोन-तीन महिने गायब राहूनसुद्धा पगार वेळेवर काढले जातात, असे नागरिक सांगत आहेत. पळसदर येथील उपकेंद्रात आरोग्य सेविकेचे पद रिक्त असून, अतिरिक्त चार्ज एनआरएचएमकडे देण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना ताटकळत वैद्यकीय अधिकारीची उपचारासाठी वेळ पाहत असतात. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा फटका रुग्णांना बसत आहे.
लाखो रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आलेले आरोग्य केंद्राची इमारत सर्व सुविधांयुक्त आहे. मात्र इमारतीतील शौचालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. शौचालयाअभावी या अद्ययावत केंद्रामध्ये नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत
आहे. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर आरोग्य केंद्राकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Tirath Health Center Ram Bharose