शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उशिरापर्यंत त्र्यंबकेश्वरची सुनावणी सुरू, बहुतांश तक्रारी निकाली

By admin | Updated: March 22, 2015 00:36 IST

जिल्हा बॅँकेच्या हरकतींवर सोमवारी निर्णय

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सभासद मतदार यादीबाबत काल (दि.२१) विभागीय सहनिबंधक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी एम. ए. आरिफ यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरकतींवर सुनावणी सुरू होती. शनिवारी (दि.२१) पुन्हा जिल्हा बॅँकेच्या हरकतींवर सुनावणी झाली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सभासद प्रतिनिधी ठरावांबाबत नाशिक जिल्ह्णातून ७५ ते ८० तक्रारी प्राप्त झाल्या असून, विभागातील धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर जिल्हा बॅँका मिळून एकूण ५४२ तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसाठी पाच हजार भागभांडवल असलेल्या सभासदांचे ठराव करण्याची अट टाकण्यात आली असून, विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचे पाचशे रुपये जमा असल्याने त्यात चार हजार पाचशेंची भर टाकून एकूण पाच हजारांचे भागभांडवल दाखविण्यात आल्याबाबत तक्रारी व आक्षेप घेण्यात आल्याचे समजते. निफाड तालुक्यातील एकूण १५ तक्रारींवर सुनावणी झाली. त्यात बहुतांश तक्रारी व आक्षेप हे मुदतवाढीच्या काळात केलेल्या ठरावांचे मतदार ग्राह्य धरण्यासंदर्भात होते. मात्र त्या तक्रारी फेटाळण्यात आल्याचे कळते. यावेळी माजी संचालक राजेंद्र डोखळे. राजेंद्र भोसले, विठ्ठल शिंदे, संपतराव व्यवहारे, माधवराव ढोमसे आदि उपस्थित होते. शनिवारी सिन्नर तालुक्यातील प्राप्त झालेल्या तक्रारीत आमदार राजाभाऊ वाजे यांच्याबाबत दोन तक्रारी असल्याचे कळते. त्यात वाजे हे थकबाकीदार संस्थेचे प्रतिनिधी असल्याचा आक्षेप होता. या संस्थेचा त्यांनी आठ-नऊ महिन्यांपूर्वीच राजीनामा दिल्याने ती तक्रार फेटाळण्यात आली, तर दुसरी तक्रार ते सिन्नर व्यापारी बॅँकेचे संचालक असताना बॅँकेची कलम ८८ नुसार चौकशी सुरू असून, त्यात ते दोषी असल्याची हरकत होती. सहकारमंत्र्यांनी ८८च्या चौकशीला स्थगिती दिलेली असल्यानेही तक्रारही निकाली काढण्यात आल्याचे कळते. सायंकाळी उशिरा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरकतींवर सुनावणी सुरू होती. माजी अध्यक्ष परवेज कोकणी यांच्यासह आजी-माजी संचालक यावेळी उपस्थित असल्याचे कळते. (प्रतिनिधी)