शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीवर वेळकाढूपणाचे धोरण

By admin | Updated: April 30, 2017 01:13 IST

सिन्नर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या धोरणावर मुख्यमंत्री वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

 सिन्नर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या धोरणावर मुख्यमंत्री वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. सिन्नर येथे शुक्रवारी सायंकाळी द बारामती सहकारी बॅँकेच्या शाखा उद्घटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार राजाभाऊ वाजे अध्यक्षस्थानी होते. विधानसभेतील १६५ आमदारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली आहे. मात्र ‘वेळ आल्यावर पाहू’ असे म्हणत मुख्यमंत्री वेळकाढूपणा करीत असल्याचे पवार म्हणाले. सिन्नरकरांनी यापूर्वी अनेक प्रकल्पांसाठी जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गासाठी पुन्हा त्यांच्यावर जबरदस्ती होऊ नये. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग बनविण्यापेक्षा आहे जुना मुंबई-नागपूर महामार्ग आठपदरी करण्याचा सल्ला पवार यांनी दिला. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे नाव बिनीच्या जिल्हा बॅँकांमध्ये घेतले जात होते. मात्र आज जिल्हा बॅँकेची काय अवस्था झाली आहे असा प्रश्न पवार यांनी केला. नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळात सर्वपक्षीय रथी-महारथींचा समावेश आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या ताब्यात जिल्हा बॅँक असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले. पीककर्जाच्या बाबतीत तर अतिशय अवघड परिस्थिती बनली आहे. जिल्हा बॅँकेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच विविध कार्यकारी सोसायट्यांचे सभासद शेतकरी त्यास काही प्रमाणात जबाबदार आहेत. चुकीच्या लोकांना सोसायटीच्या संचालकांमध्ये निवडून दिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची टीका केली. (वार्ताहर)