शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

तीन खोल्यांमध्ये पावणे तीनशे विद्यार्थी

By admin | Updated: August 18, 2016 01:33 IST

आयुक्तांना निवेदन : वडाळा उर्दू हायस्कूलमध्ये सोयी-सुविधांची वानवा

नाशिक : शहरात महापालिकेच्या केवळ दोन उर्दू माध्यमिक शाळा असून, यापैकी एक वडाळागावात आहे. या शाळेला मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र इमारतीची प्रतीक्षा आहे. तीन वर्गखोल्यांमध्ये पावणे तीनशे विद्यार्थी बसत आहेत. तसेच अन्य सोयीसुविधांचीदेखील वानवा आहे. याबाबत स्थायी समिती सदस्य रशिदा शेख यांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांचे लक्ष वेधले आहे.वडाळागावात एकाच इमारतीमध्ये सकाळ-दुपार सत्रात प्राथमिक शाळा भरते, तर याच इमारतीच्या तळमजल्यावरील तीन खोल्यांमध्ये माध्यमिक विद्यालयाचे वर्ग भरत आहेत. सुरुवातीला शाळेची पटसंख्या कमी होती. त्यामुळे गैरसोय होत नव्हती मात्र मागील पाच वर्षांपासून शाळेच्या पटसंख्येत वाढ झाली असून, सुमारे पावणे तीनशे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. वर्गखोल्यांची संख्या अपुरी असल्यामुळे संगणक कक्ष, प्रयोगशाळादेखील या ठिकाणी चालविता येणे अवघड झाले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन इमारतीच्या गच्चीवर मंडप टाकून केले जाते. तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रसाधनगृह नसून पिण्याच्या पाण्याचीही मुबलक व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आलेली नसल्याचे आयुक्तांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे. पाच वर्षांपासून सातत्याने उर्दू माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागला आहे. एकूणच गुणवत्ता आणि शिक्षणाचा दर्जा सुधारत असताना भौतिक सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्याने पालकवर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षण मंडळ सभापती व प्रशासनाधिकाऱ्यांनी या शाळेत भेट देण्याची मागणी होत आहे. पंधरवड्यात शाळेच्या समस्या न सोडविल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा शेख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाची एक प्रत प्रशासनधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)