शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडच्या रेणुकादेवी घाटात अपघातात तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:08 IST

चांदवड येथील रेणुकादेवी मंदिर घाटात नाशिककडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव ट्रेलरने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दांपत्यासह चिमुरडीचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. १८) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. गांगुर्डे कुटुंबीयांवर काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

ठळक मुद्देट्रेलरची दुचाकीला धडक : विवाहसोहळा आटोपून परतताना घडली दुर्घटना

चांदवड : येथील रेणुकादेवी मंदिर घाटात नाशिककडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव ट्रेलरने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दांपत्यासह चिमुरडीचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. १८) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवीघटना घडली. गांगुर्डे कुटुंबीयांवर काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान,या तिघांवर नाशिकरोड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.नाशिकरोड, जेलरोड येथील नितीन भीमाजी गांगुर्र्डे (३६), पत्नी पूजा नितीन गांगुर्डे (३०) आणि मुलगी अथर्वी (३) हे दुचाकीने (क्र. एमएच जीएस ०१७६) लखमापूर, ता. सटाणा येथील विवाह समारंभ आटोपून उमराणेमार्गे मुंबई आग्रारोडने नाशिककडे जात होते. त्यांच्या दुचाकीला मागून येणाºया ट्रेलरने (क्र. सीजी ०४/ जेए ४५२७) जोरदार धडक दिल्याने हे तिघेही जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रेलरचालक रतनसिंग फिरोजसिंंग (रा. मुंबई) याने घटनास्थळावरून पलायन केले. मात्र परिसरातील नागरिकांनी सदर ट्रेलर मंगरूळ टोलनाक्यावर पकडला. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका १०८ रुग्णवाहिकेने सर्व मृतदेह चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणले.मृतांच्या नातलंगाना घटनेची माहिती मिळताच त्यांनी चांदवड उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात धाव घेत एकच हंबरडा फोडला. पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

टॅग्स :Accidentअपघात