शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

बाराशे उपनिरीक्षकांकडून शेतकऱ्यांना तीन लाख

By admin | Updated: January 30, 2016 23:46 IST

सोशल मीडियावरून मदतीची हाक : २०१२ च्या तुकडीकडून ‘नाम’ला निधी

संदीप झिरवाळ पंचवटीराज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक २०१२ या वर्षातील सत्र क्रमांक १०८ या बॅचच्या अधिकाऱ्यांनी कर्तव्य करत असताना सामाजिक बांधीलकी जपत ३ लाख ११ हजार २०२ रुपयांच्या निधीचा धनादेश नाम फाउंडेशन संस्थेकडे सुपूर्द केला आहे. पोलीस उपनिरीक्षकांनी पुढाकार घेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर ओढावलेल्या अस्मानी संकटात शेतकऱ्यांप्रती असलेली जबाबदारी निभावत ‘शेतकरी जगला, तरच देश जगेल’ या भावनेला कृतीने जोड दिली आहे. सध्या राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी नापिकतेमुळे व कर्जबाजारीला कंटाळून निराशेपोटी आत्महत्त्या करत आहेत. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आत्महत्त्या करण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांना एक आधार म्हणून पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक १०८ बॅचतर्फे पुढाकार घेण्यात आला. संपूर्ण राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांनी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून व्हॉट््स अ‍ॅपच्या माध्यमातून ग्रुप तयार केला. निधी संकलनासाठी मुंबईतील प्रवीण सुरवाडे या पोलीस उपनिरीक्षकाने पुढाकार घेतला व अन्य पोलीस उपनिरीक्षकांच्या मदतीने या सत्कार्यासाठी व्हॉट््स अ‍ॅपवर ‘१०८ सेव्ह फार्मर’ ग्रुप असे १२ ग्रुप तयार करून राज्यातील सुमारे १२०० पोलीस उपनिरीक्षकांना एकत्र आणले व ‘१०८ सेव्ह फार्मर’ या व्हॉट््सअ‍ॅप ग्रुपवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी याबाबत संदेश पसरविण्यात आला. या ग्रुपच्या माध्यमातून पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंत उपनिरीक्षकांनी मदत केली. याकामासाठी व्हॉट््सअ‍ॅपवर पोलीस उपनिरीक्षकांचे बॅँकेचे खाते क्रमांक पाठविण्यात आले होते. त्यानुसार खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जमा झालेली ३ लाख ११ हजार २०२ रुपयांची रक्कम पुणे येथील शिवगंगा प्रतिष्ठान या एनजीओच्या मदतीने जमा करण्यात आली त्यानंतर सदरच्या मदतनिधीचा धनादेश नाम फाउंडेशनचे विश्वस्त मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.