शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रात्रीत तीन घरे फोडली

By admin | Updated: September 14, 2015 22:59 IST

सटाणा : दोन लाखांचा ऐवज लंपास; नागरिकांमध्ये घबराट

सटाणा : शहरात चोरी सत्र सुरूच असून, क्रांतिनगर भागात अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून सुमारे दोन लाख रु पयांचा ऐवज लुटून नेला. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. वाढत्या चोऱ्यांमुळे शहरात घबराटीचे वातावरण आहे.शहरातील नामपूररोडवरील क्रांतिनगर भागातील रहिवासी कुंदन काकाजी खैरनार हे पोळ्यानिमित्त गावी गेले होते. घराला कुलूप असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराचे कुलूप तोडले. व घरात प्रवेश करून कपात तोडून कपाटात ठेवलेला अडीच तोळ्याचा सोन्याचा हार, एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, दीड तोळ्याचे लॉकेट, एक तोळ्याचे कानातील ऐवजसह दहा हजारांची रोकड असा दीड लाख रुपयांचा ऐवज लुटला त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा जवळच असलेल्या योगेश बाळासाहेब भदाणे यांच्या घराकडे वळवला. भदाणे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील बावीस हजारांची रोकड व पाच हजाराचा सोन्याचा ऐवज लंपास करून भगवान लक्ष्मण बर्डे यांच्या घर फोडले. घरातील सतरा हजार रुपये किमतीच्या सोन्या-चांदी ऐवजासह घड्याळ चोरून नेले. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला.या प्रकरणी सटाणा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक पी. टी. पाटील करीत आहेत. (वार्ताहर)

मालेगावी यंत्रमाग कारखान्यात चोरीमालेगाव : येथील  गुलशनेराज सर्व्हे नं.११४ प्लॉट नं. ४४ मधील यंत्रभाग कारखान्यातून अज्ञात चोरट्याने ४६ हजार रुपयांचा माल घरफोडी करून चोरून नेल्याची फिर्याद किल्ला पोलिसांत दाखल करण्यात आली. इमरान अख्तर मोहंमद सलीम (३४), रा. गुरुवेदनगर, बडा कब्रस्तानजवळ या यंत्रमागधारकाने फिर्याद दिली. त्याच्या मालकीच्या वरील यंत्रमाग कारखान्यामागील पत्र्याच्या शेडचा पत्रा कापून चोरट्याने आत प्रवेश केला व चोरट्याने ४६ हजारांचा माल चोरून नेला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वराडे करीत आहेत.

चोरांच्या चर्चेने ग्रामस्थ चिंताग्रस्तदरेगाव : सध्या ग्रामीण भागात सर्वत्र चोरांच्या चर्चा झडताना दिसत आहेत. विशेषत: अनेक वस्त्या व शेतामध्ये तसेच गावातही चोरट्यांच्या भीतीपायी नागरिक रात्री आळीपाळीने जागे राहून सतर्क राहत असल्याचे दिसत आहे. दररोज चोरांच्या नवनव्या अफवांमुळे ग्रामस्थ चिंताग्रस्त होताना दिसतात. व्हॉट्सअँपसारख्या सोशल मीडियावरून चोर्‍यांबाबत अफवा पसरविल्या जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत. अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

सततच्या दुष्काळाने होरपळलेल्या ग्रामीण भागात सध्या चोरट्यांसंदर्भातील अफवांमुळे भीतीचे वातावरण आहे. सातच्या आत घरात पोहचतानाही धाकधूक होत असल्याने रात्री होत असलेल्या चोर्‍यांबाबत चर्चा होत असते. ग्रामीण भागातील शेतमजूर, शेतकरी, महिलावर्गात सर्वत्र चोर्‍यांसंदर्भात चर्चा होताना दिसते.

ग्रामीण भागातील रस्ते रात्रीचे ओस पडू लागले आहेत व व्हॉट्सअँपवर इकडे चोर आले, तिकडे चोर आले अशा अफवा पसरविल्या जात आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांच्या मदतीसाठी ग्रामरक्षक दल कार्यान्वित करण्यात आले आहे