आरोपींना तीन दिवसांची कोठडी

By Admin | Updated: March 2, 2016 23:55 IST2016-03-02T23:53:58+5:302016-03-02T23:55:26+5:30

मकवाना खून प्रकरण

Three days in jail for the accused | आरोपींना तीन दिवसांची कोठडी

आरोपींना तीन दिवसांची कोठडी

 नाशिकरोड : मागील भांडणाच्या कुरापतीवरून एका प्रॉपर्टी डिलरच्या डोक्यात गोळी झाडून हत्त्या करणाऱ्या संशयितांना बुधवारी नाशिकरोड न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
जयभवानीरोड फर्नांडिसवाडी येथील रणजीत जगशरण मकवाना याची १५ दिवसांपूर्वी मध्यरात्री मागील भांडणाची कुरापत काढून संशयित रोहित ऊर्फ माले डिंगम, मयूर चमन बेद, संजय ऊर्फ मॉडेल चमन बेद व विनोद राजाराम साळवे सर्व रा. फर्नांडिसवाडी यांनी डोक्यात बंदुकीने गोळी झाडून हत्त्या केली होती. याप्रकरणी संशयित रोहित ऊर्फ माले डिंगम, संजय ऊर्फ चमन बेद व विनोद राजाराम साळवे यांना पोलिसांनी अटक केली होती. तिघा संशयितांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी दुपारी नाशिकरोड न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर चौथा संशयित मयूर चमन बेद अद्याप फरार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three days in jail for the accused