शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

नाशकात तीन घरफोड्या ;नागरिकांमध्ये चोरट्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 4:14 PM

नाशकात इंदिरानगर, मुंबई नाका व सातपूर भागात गेल्या दोन दिवसात तीन घरफोड्यांच्या घटना उघड झाल्या असून शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. दिवसेंदिवस घरफोड्यांचे प्रमाण वाढत असल्याने  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांचा कोणताही वचक उरला नसल्याने शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याची तक्रार नागरिकाकडून होत आहे.

ठळक मुद्देनाशिक शहरात तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना  इंदिरानगर, मुंबईनाका, सातपूरच्या रहिवास्यांमध्ये भिती 

नाशिक : इंदिरानगर, मुंबई नाका व सातपूर भागात गेल्या दोन दिवसात तीन घरफोड्यांच्या घटना उघड झाल्या असून शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. दिवसेंदिवस घरफोड्यांचे प्रमाण वाढत असल्याने  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांचा कोणताही वचक उरला नसल्याने शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याची तक्रार नागरिकाकडून होत आहे. पाथर्डीफाटा, आनंदनगर परिसरातील विक्रीकर भवनजवळील वास्तू रो हाऊसमध्ये कल्पेश अधिकराव पाटील (२९) यांच्या घरी १० आॅगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत घरफोडी झाली. यात अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ३७ हजार रुपये किंमतीची ५ ग्रॅम वजनाची अंगठी, ९ हजार ,रुपये किंतीचे तीन ग्रॅमचे सोन्याची कर्णफुले, १ग्रॅ्रमचा सोन्याचा मणी व दहा हजार रुपये रोख असा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक ए. के. जगताप  तपास करीत आहेत. दुसरी घरफोडी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. अशोकामार्ग परिसिरातील वाजिद मकसूद खान यांच्यासह त्यांच्या शेजारच्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात पाचशे रुपयांच्या ३० नोटा असे १५ हजार  व पाचशे रुपयांच्या शंभर नोटा असे  ५० हजार रुपये मिळून ६५ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली. याप्रकरणी वाजिद खान याने दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबईनाका परिसरात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार संजय भिसे तपास करीत आहेत. तिसरी घटना सातपूरमध्ये अमृतवाणी पाण्याच्या टाकीजवळ एमएचबी कॉलनीतील बुधवारी (दि.४) रात्री साडेबारा ते सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडली. यात चोरट्यांनी प्रवीण मोहन सोन्स यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात २० हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन, १२ हजार रुपयांचे ब्रसलेट, १० हजार रुपयांची सोन्याची अंगठी, दहा हजार रुपयांचा पिळदार वेढा, १० हजार रुपये किंमतीचे कर्णफुले आदि दागिन्यांचा समावेश आहे. सोन्स यांची आई फ्रान्स येथे जाणार असल्याने ते कुटुंबासह आईला सोडण्यासाठी मुंबई विमानतळावर गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घरावर हात साफ केला. अशाप्रकारे शहरातील विविध ठिकाणी बंद घरांवर लक्ष ठेवून असलेल्या चोरट्यांनी पोलिसांसमोर घरफोड्या रोखण्याचे आव्हान निर्माण केले आहे.नाशिक शहरात तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना इंदिरानगर, मुंबईनाका, सातपूरच्या रहिवास्यांमध्ये भिती 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसRobberyचोरीThiefचोर